नायडू रुग्णालयाची इमारत पाडण्यास काँग्रेसचा विरोध

naidu-hospital
naidu-hospital

पुणे - डॉ. नायडू रुग्णालयाची इमारत पाडण्यास आणि महापालिकेच्या हद्दीत उर्वरित गावे समाविष्ट करण्यास विरोध करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या शहर काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. नेहमीप्रमाणे या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत वादाचे पडसाद उमटले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेत झालेल्या बैठकीला शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, उल्हास पवार, महापालिकेतील पक्षाचे गटनेते आबा बागूल यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नेते मंडळी उपस्थित होती. आगामी निवडणुकांतील वॉर्डपद्धती, स्मार्ट सिटी, गावे समाविष्ट करणे, एचसीएमटीआरपासून ते महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या नियोजित अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. मात्र काही नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. ही बैठक पक्षाचे धोरण ठरविण्यासाठी की महापालिकेचा अजेंडा ठरविण्यासाठी बोलविली, यावरून देखील येथे चर्चा झडली. पक्षाची बैठकी असेल, तर काँग्रेस भवन येथे का नाही, असा प्रश्‍नही एका नेत्यांनी यावेळी बैठकीत उपस्थित केला.

वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास विरोध नाही. परंतु डॉ. नायडू रुग्णालयाची इमारत पाडून देऊ नये, अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली. तर महापालिकेच्या हद्दीत उर्वरित गावे समाविष्ट करण्यास विरोध करावा. त्याऐवजी महापालिकेचे विभाजन करून नवीन महापालिका स्थापन करण्याचा आग्रह धरावा, अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी, मंत्री वारंवार पुणे शहरास भेट देतात, काँग्रेसचे नेते मंडळी का येत नाही, असा सवाल एका नेत्याने या बैठकीत केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांनी पक्षाला रामराम केला. आजच्या बैठकीत एका नेत्याने पुन्हा त्याचा दाखला देत पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देऊ नये. तसेच ज्यांनी विरोधात काम केले, त्यांची गय केली जाऊ नये, असा मुद्दा ठासून मांडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com