esakal | काँग्रेस पक्षाने गरिबांना न्याय दिला- माजी गृहराज्यमंत्री बागवे | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

pune

काँग्रेस पक्षाने गरिबांना न्याय दिला- माजी गृहराज्यमंत्री बागवे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : काँग्रेस पक्षाने गोरगरीब, वंचित, शोषित वर्गास केंद्रबिंदू मानून, झोपडपट्टी पुनर्वसन, मोफत धान्य, अशा अनेक योजना आणल्या, तोच वारसा समोर ठेऊन इम्रान शेख यांनी महिलांसाठी प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असे गौरवोद्गार माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काढले.

पुणे शहर काँग्रेसचे संघटक इम्रान भाई शेख यांनी दिया फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व स्वयंरोजगार शिबीर आयोजित केले होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेस शहर उपाध्यक्ष प्रशांत सुरसे, राहुल वंजारी, अश्विनी वाघ, रोहित दामोदर, सुवर्णा भरेकर, विद्या भागवत आदी उपस्थित होते.

शहर काँग्रेसचे संघटक इम्रान शेख म्हणाले की, बेरोजगारीवर मात करण्यासाठी परिसरातील गोरगरीब महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. शिबिराच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मतीन शेख, इम्रान पानसरे, असलम सय्यद, अतीफ शेख, तौफीक शेख, जबार शेख, रहीम शेख रफीक शेख, वसीम शेख, सुफीयान काझी अंकीता सोनवने, सफीया शेख, अलीया शेख, सदफ शेख यांनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

loading image
go to top