

Congress spokesperson Hanumant Pawar seen during the Pune assault incident; video of the attack was shared by Maharashtra Congress President on social media.
esakal
Congress Spokesperson Hanumant Pawar Assaulted in Pune : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यात एका मीडिया ऑफिसबाहेर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला असून, माराहाणीचा व्हिडिओ ट्वीट करत, संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डिबेट शोसाठी ते संबंधित ठिकाणी गेले असताना तुषार दामगुडे आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घटनेचा व्हिडिओ ट्वीट करत म्हटले आहे की, ‘’कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना दैनिक पुढारी कार्यालय, मित्र मंडळ चौक पुणे येथे भाजप गुंड तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो.’’
तसेच ‘’देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरूंगात टाकण्यात यावे, त्याची खरी जागा तीच आहे.’’ अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.