भाजपमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा - प्रियांका चतुर्वेदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - ""कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन आपले गोत्र आणि वर्ण सांगून तेथील परंपरेचा आदरच केला आहे; पण जे केवळ धर्माचे ठेकेदार म्हणून काम करतात, त्यांना यात राजकारण दिसत आहे,'' अशी टीका कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय जनता पक्षावर केली. भाजपमध्ये खोटारडी मंडळी खूप आहेत. खोटे बोलण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू असून, त्यांच्या बोलण्यातील सत्यता शोधणे अशक्‍य आहे, असेही त्या म्हणाल्या. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

भाजप सरकारची कामगिरी लोकांसमोर आणून कॉंग्रेसची भूमिका मांडण्यासाठी चतुर्वेदी देशव्यापी दौरा करीत आहेत. त्या मंगळवारी पुण्यात आल्या होत्या. या वेळी त्यांनी "सकाळ' कार्यालयाला भेट देऊन "सकाळ फेसबुक लाइव्ह'वर संवाद साधला. केंद्र सरकारची धोरणे, त्याचे परिणाम, राफेल विमान खरेदी, शबरीमला, बेरोजगारी आदी मुद्‌द्‌यांवरून चतुर्वेदी यांनी सरकारवर सडकून टीका केली. 

मध्य प्रदेशातील मंदिरात राहुल गांधी यांनी स्वतःचे गोत्र आणि वर्ण सांगून पूजा केली होती. त्यावरून राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात चतुर्वेदी म्हणाल्या, ""राहुल यांनी तेथील परंपरेचा आदर केला आहे. कोणत्याही मंदिरात आपण गेल्यानंतर तेथे जी माहिती विचारली जाते, ती आपण देतो. हा तेथील परंपरेचा सन्मान आहे. शबरीमला हा श्रद्धेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने तेथे महिलांसाठीची प्रवेशबंदी उठवली असली तरी, समाज अजून ते मान्य करत नाही. त्यांचे मत विचारात घेऊनच अशा प्रश्नांतून मार्ग काढावा लागतो.'' 

""मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण येथील निवडणुकांनतर कॉंग्रेसयुक्त भारत होण्यास सुरवात होईल. राहुल यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेत प्रत्येक राज्यात टीम बांधली आहे. त्यामुळे पक्षाच्या कामगिरीत आता नक्कीच सुधारणा होईल.'' 

पुण्यात कॉंग्रेस वाढतेय 
""पुण्यातील कॉंग्रेसच्या कामगिरीबाबत चतुर्वेदी म्हणाल्या, ""पुण्यातील पक्षसंघटना वाढत आहे. महापालिकेत भाजपचे इतके नगरसेवक निवडून आले असले तरी, यापुढील काळात कॉंग्रेसची सत्ता असेल. ज्या पक्षाचे दोन खासदार होते, त्या पक्षाचे 272 खासदार निवडून आले, तेव्हा भविष्यात कॉंग्रेसला चांगले दिवस येतील,'' असा विश्‍वासही चतुर्वेदी यांनी व्यक्त केला.

Web Title: Congress Spokesperson Priyanka Chaturvedi criticized the BJP