चावंडला आढळलेल्या बेडकाचे संवर्धन व्हावे: निसर्ग व प्राणी प्रेमींची मागणी

दत्ता म्हसकर
शनिवार, 16 जून 2018

जुन्नर - ऐतिहासिक चावंडच्या किल्ल्यावर निसर्गप्रेमी माजी सैनिक रमेश खरमाळे यांना आढळून आलेल्या बहुविस्तारा या बेडकाचे संवर्धन व्हावे अशी निसर्ग व प्राणी प्रेमींची मागणी आहे. विषयी माहिती देताना खरमाळे म्हणाले, भारतीय द्विकल्पाच्या प्रदेशात हा उभयचर प्राणी आढळतो. याचे नाक लांब असून नाकापासून पाठीवर पसरलेला थोडासा तांबूस रंगाचा पट्टा पाहायला मिळतो. पायावरचा रंग काळसर असून त्यावर गोल्डन स्पॉट्स दिसतात. पायाची बोटे लांब असतात जेणे करून खडकामधील खाचेमध्ये किंवा दगडावर त्याची पकड भक्कम राहते. 

Hydrophylax bahuvistara (Wide - Spread Fungoid Frog) या बेडकाला 2015 साली डॉ. आनंद पाध्ये आणि सहाय्यक संशोधकांनी Hydrophylax bahuvistara असे संबोधले. हा बेडुक Ranidae कुळातील असुन Fungoid frog म्हणून ओळखला जातो. याचे नाव bahuvistara हे संस्कृत भाषेतल्या शब्दांची मदत घेऊन ठेवण्यात आले, बहू म्हणजे रुंद आणि विस्तारा म्हणजे विस्तारित असलेला. 

हा बेडूक विषारी नसून या बेडकाच्या अंगावरुन मिळणाऱ्या स्त्रावमध्ये उरीमिन हे रसायन असते. भारत आणि अमेरिकेच्या संशोधकांनी याचा शोध लावला. हे उरीमिन रसायन शीतज्वराचा इन्फ्लुएन्झा H1 या विषाणुवरील औषध असून, ते हा विषाणू मारण्यास सक्षम झाले असल्याची त्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे.

हा बेडूक नुकताच माजी सैनिक रमेश खरमाळे यांना किल्ले चावंडच्या भुयार निरिक्षणामध्ये जवळपास ४५ फुटावर भुयारामध्ये आढळुन आला. त्यांनी त्याची विविध अंगाने छायाचित्रे टिपली. या बेडकाचा मराठी अनुवाद उपलब्ध न झाल्याने जुन्नरच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील प्रा.गौरव कांबळे यांच्या मदतीने मराठी अनुवाद तयार केला असून अशा ह्या उभयचर प्राण्यांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Web Title: Conservation of the frond found in Chavand: Nature and animal lover demand