स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी पर्यायांचा विचार

भुयारी मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यातील सुमारे ७३३ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी पुढे ढकलला.
Pune Metro
Pune MetroSakal

पुणे - स्वारगेट-कात्रज मार्गावर (Swargate Katraj Route) भुयारी मेट्रोसाठी (Undergroudn Metro) सुमारे ४ हजार २०० कोटी रुपये खर्च (Expenditure) येणार असल्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि मेट्रो निओच्या पर्यायांचही विचार करणार असल्याचे महापालिकेकडून (Municipal) मंगळवारी सांगण्यात आले. (Consider Options for Swargate Katraj Metro)

भुयारी मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यातील सुमारे ७३३ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी पुढे ढकलला. या पार्श्वभूमीवर मेट्रोचे अन्य पर्यायही तपासले जाणार आहेत. पिंपरी चिंचवड-स्वारगेट या मार्गावर शिवाजीनगर ते स्वारगेट हा साडेपाच किलोमीटरचा मार्ग भुयारी मेट्रोचा आहे. आता स्वारगेट-कात्रज मार्गावर भुयारी मेट्रोसाठी महामेट्रोने प्रकल्प अहवाल सादर केला आहे. काम सुरू झाल्यावर हा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण होईल, असेही महामेट्रोने म्हटले आहे.

पिंपरी-स्वारगेट मेट्रोमार्गाच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने २० टक्क्यांऐवजी १० टक्के निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे उर्वरित दहा टक्क्यांतील पुणे महापालिका आणि राज्य सरकार प्रत्येकी ५ टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. त्यामुळे महापालिकेवर अतिरिक्त ७३३ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे स्वारगेट-कात्रज मार्गावर मेट्रो निओ सुरू करावी, असा प्रस्ताव पीएमपीने महापालिकेला सुचविला आहे. या मार्गावरील बीआरटीच्या मार्गावर मेट्रो निओ सुरू करता येईल. त्यासाठीची स्थानकेही तयार आहेत, असे असेही पीएमपीने म्हटले आहे.

Pune Metro
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्ष घातले अन्...

काँग्रेसचा विरोध

केंद्र सरकारने मेट्रोसाठीची तरतूद १० टक्क्यांनी कमी केली आहे. महापालिकेवरील भार वाढणार असल्यामुळे पुणेकरांवर किमान ५०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यावर केंद्राने तरतूद कमी करणे म्हणजे पुणेकरांवर अन्याय आहे. भाजप नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्यांचे मानधन पीएम केअर फंडला दिले होते. तरीही आता पुणेकरांवर हा वाढीव बोजा कशासाठी, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गासाठी कमी खर्चातील अन्य पर्याय उपलब्ध झाले, तर त्यांचे स्वागत करण्यात येईल. महामेट्रोच्या सादरीकरणादरम्यान तिन्ही पर्यायांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर महापालिकेचे आर्थिक हित पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल.

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com