पिंपरी : आनंदनगरकरांचा घरी परतण्याचा प्रवास सुरू 

an.jpg
an.jpg

पिंपरी : सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या चिंचवड स्टेशन आनंदनगर येथील कोरोना बाधित रुग्णांनी आता बरे होऊन घरी परतण्याचा प्रवास सुरू केलेला आहे. बुधवारी तीन रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, त्यांना 14 दिवस होमक्वारंटाइन राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. 

चिंचवड स्टेशन परिसरातील आनंदनगर वसाहत. कष्टकऱ्यांची वस्ती. पुणे-मुंबई महामार्गालगतचा हा भाग. येथेही कोरोनाने नकळतपणे शिरकाव केला. कोणाच्या ध्यानी-मनी नसताना कोरानाने डोके वर काढले आणि सर्व वस्तीच हादरली. येथील पहिले दोन रुग्ण तेरा मे रोजी आढळले होते. त्यांना त्रास व्हायला लागल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात आली. आजही तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी फ्लू क्‍लिनिक आणि मोबाईल लॅबची मदत होत आहे. आजपर्यंत दीडशेपेक्षा अधिक रुग्ण येथे आढळले आहेत. अनेकांनी क्वारंटाइन केले आहे. कोरोनाचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी महापालिाक वैद्यकीय व आरोग्य विभागातर्फे अधिकाधिक खबरदारी घेतली जात आहे. 

कोरोना संसर्ग झालेल्या आनंदनगरमधील सर्वांना महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील तिघांचे चौदा दिवस उपचाराचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुले त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून ते निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वायसीएम व भोसरी रुग्णालयात चौदा दिवस उपचार घेतल्यानंतर आज 21 जणांना घरी सोडण्यात आले. त्यांच्यामध्ये चिंचवड स्टेशन आनंदनगर येथील तिघांसह शहरातील किवळे, संभाजीनगर- चिंचवड, रुपीनगर- निगडी, रहाटणी, चिखली आणि पुण्यातील कसबा पेठ व बोपोडी येथील रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, बुधवारी 17 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यात आनंदनगरचे चार जण असून अन्य रुग्ण पिंपरीतील भाटनगर, बौद्धनगर, किवळे, वाकड, निगडी, पिंपळे गुरव, सांगवी, बोपखेल, काळेवाडी फाटा, चऱ्होली आणि आंबेगाव येथील रहिवासी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com