पुणे : बिल्डरला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले, 'त्या' तिघांविरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

फिर्यादी ऋषीकेश बारटक्के हे बांधकाम व्यवसायीक आहेत. त्यांना 2017 ते 2018 दरम्यान आरोपींनी सेनापती बापट रस्ता येथील शिवाजी हौसिंग सोसायटीमधील 7500 चौरस फुटांची जमीन व त्यावरील एक हजार चौरस फुटांचा बंगला दाखविण्यात आला.

पुणे : बलात्काराच्या खोट्या गुन्हा दाखल असलेल्या बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह सात जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून जमीन विक्रीच्या प्रकरणात 72 लाख रूपये घेऊन पुन्हा त्याच्याकडे सुमारे दोन कोटीची मागणी करीत पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तिघाना अटक करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बडतर्फ पोलिस परवेज शब्बीर जमादार (वय 35, रा. सोमवार पेठ पोलिस वसाहत), जयेश जितेंद्र जगताप (30, रा. घोरपडे पेठ), अमित विनायक करपे (33, रा. रास्ता पेठ) असे अटक केलेल्याची नावे आहेत. तर बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन, माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, प्रकाश फाले (रा. सांगवी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून बऱ्हाटे, फाले फरारी आहेत. तर शैलेश जगताप व देवेंद्र जैन यांना कोथरुड पोलिसांनी यापुर्वीच अटक केलेली आहे. याप्रकरणी ऋषिकेश अशोक बारटक्के (35 रा. बाणेर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

आणखी वाचा - भावाच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही, अन्....

बारटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी ऋषीकेश बारटक्के हे बांधकाम व्यवसायीक आहेत. त्यांना 2017 ते 2018 दरम्यान आरोपींनी सेनापती बापट रस्ता येथील शिवाजी हौसिंग सोसायटीमधील 7500 चौरस फुटांची जमीन व त्यावरील एक हजार चौरस फुटांचा बंगला दाखविण्यात आला. संबंधित मालमत्ता ही प्रकाश फालेची असून, फाले व जयेश जगताप यांच्यात संबंधीत जागेबाबत करारनामा झाला असल्याचे सांगण्यात आले. त्याची प्रत देखील त्यांना दाखवली. संबंधित जागेबाबत फाले याच्या न्यायालयीन दाव्यावर युक्तीवाद झाला असून, तीन महिन्यांत न्यायालयाचा निकाल त्यांच्याच बाजूने लागणार असल्याचे भासविण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांना या जमिनीचा व्यवहार करण्यास प्रवृत्त केले. तसेच जागेवरील हक्क सोडण्यासाठी दोन कोटी रूपये व जागा मालक म्हणून फाले यास अडीच कोटी रूपये द्यावे लागतील, असे त्यांनी फिर्यादीस सांगितले. त्यानुसार या व्यवहारासाठी सुरुवातीआ फिर्यादींनी फाले यास 49 लाख 30 हजार रुपये दिले, तर अमित करपे याच्या बॅंक खात्यात 11 लाख 50 हजार रुपये वर्ग केले. त्याचवेळी शैलश जगतापने फिर्यादीकडे फोर्ड एन्डेव्हर गाडीची मागणी केल्याने त्याच्यासाठी 50 हजार रुपये भरून वाशी येथे गाडीचे बुकिंग केले होते. त्यानंतर ही शैलेश व जयेश या दोघानी फिर्यादीस वेगवेगळी कारणे सांगून अनेकदा पैशाची मागणी केली होती. त्यानुसार फिर्यादींनी त्यांच्याकडील सोने गहाण ठेवून 11 लाख रुपयेही दिले.

आणखी वाचा - पुण्यात अचानक धरण फुटलं आणि होत्याचं नव्हतं झालं

मारहाण आणि पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी
दरम्यान, तीन महिन्यानी फिर्यादी बारटक्के हे जगतापच्या समर्थ पोलिस ठाण्यासमोर रास्ता पेठ येथे असलेल्या कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांनी संशयित आरोपीना जागेबाबत विचारणा  केली तेव्हा त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली.त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्याकडे व्यवहारापोटी दिलेले 72 लाख रूपये परत मागितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला फेब्रुवारी 2018 मध्ये संबंधित कार्यालयातच बोलावुन घेतले. तेथे शैलेश जगताप, त्याचा पुतण्या जयेश जगताप, रविंद्र बऱ्हाटे, परवेझ जमादार बसलेले होते. त्यावेळी शैलेश, परवेझ व जयेश या तिघाननक यांनी त्यांना मारहाण केली. तर शैलेश जगतापने त्याच्याकडील पिस्तुल फिर्यादीच्या कानशिलाला लावून "मला राहिलेले 1 कोटी 88 लाख रुपये द्यायचे नाही तर, मी तुला जिवंत सोडणार नाही, मी गनमैन आहे तुला माहिती नाही का" अशी धमकी दिली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या बऱ्हाटे याने "सोडू नका हरामखोराला, जन्माची अददल घडवा, आमच्याकडे पैसे मागतो काय, पोलिस स्टेशनला जाणार नाही,असे लिहून घ्या" असे धमकाविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: construction businessman extortion case another case against three persons including journalist