खंडणीप्रकरणातील बडतर्फ पोलिसासह पत्रकाराला पोलिस कोठडी

पांडुरंग सरोदे
सोमवार, 13 जुलै 2020

बांधकाम व्यावसायिकाची जमिनीच्या व्यवहारात 72 लाख रुपयांची फसवणूक आणि खंडणी प्रकरणात पत्रकार देवेंद्र जैन आणि बडतर्फ पोलिस शैलेश जगताप यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सात जणांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पुणे - बांधकाम व्यावसायिकाची जमिनीच्या व्यवहारात 72 लाख रुपयांची फसवणूक आणि खंडणी प्रकरणात पत्रकार देवेंद्र जैन आणि बडतर्फ पोलिस शैलेश जगताप यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सात जणांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बडतर्फ पोलिस जगतापचा पुतण्या जयेश जितेंद्र जगताप (वय 30, रा. घोरपडे पेठ), बडतर्फ पोलिस परवेज शब्बीर जमादार (वय 35, सोमवारपेठ पोलिस लाईन) आणि अमित विनायक करपे (वय 33, रा. सोमवारपेठ) या तिघांना रविवारी अटक करण्यात आली होती. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना पुन्हा एक दिवसांची कोठडी देण्यात आली.  तर जैन आणि शैलेश जगताप यांना या गुन्ह्यात सोमवारी अटक करण्यात आली. त्यांची देखील एका दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (रा. सिंहगड रोड) आणि प्रकाश फाले (रा. सांगवी) यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत बांधकाम व्यवसायिक ऋषीकेश बारटक्के (वय 35, रा. बाणेर) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

मुळशीकरांनो जरा जपून, तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढतायेत; आज...

बारटक्के हे जमीन-विक्रीचा व्यवसाय करतात. जून 2017 ते नोव्हेंबर 2018 दरम्यान बारटक्के  यांना सेनापती बापट रस्त्यावरील एका जमिनीच्या दाव्याचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वास आरोपींनी दाखवला. त्यानंतर बारटक्के यांनी आरोपींबरोबर जमिनीचा व्यवहार केला होता. परंतु, संशयित आरोपी यांनी बारटक्के यांची विविध मार्गाने तब्बल 72 लाख रुपये घेवून जमिनीचा ताबा न देता फसवणूक केली. तसेच जागेचा हक्क सोडण्यासाठी दोन कोटी आणि जागेचा मालक म्हणून फाले याला अडीच कोटी रुपये देण्याची मागणी आरोपींनी बारटक्के यांच्याकडे केली.

नोटबंदीमुळं झालं नाही ते कोरोनामुळे शक्य

व्यवहाराबाबत बारटक्के यांनी आरोपींना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी फिर्यादी देण्यात आली आहे.

याचा होणार तपास
गुन्ह्याचा कट कोठे रचण्यात आला? यात आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यात फसवणूक केलेली लाखो रुपयांची रक्कम जप्त करायची आहे. तर बऱ्हाटे आणि फाले यांना अटक करायची असल्याने  आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. बचाव पक्षाचे वकील प्रताप परदेशी, ऍड. विजयसिह ठोंबरे आणि ऍड. प्रसाद कुलकर्णी यांनी विरोध केला.

Edited By - Prashant patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: construction businessman extortion case five person get police custody