नव्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पिंपरी - पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी बोपोडीजवळील हॅरिस पुलानजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत या पुलाचे ६० टक्‍के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४० टक्‍के कामाला सुरवात झाली आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा ताण हलका होणार आहे.

दरम्यान, पुलाचे काम करण्यासाठी भाऊ पाटील रस्त्याकडून हॅरिस पुलाकडे जाणाऱ्या दुहेरी रस्त्यावरील उजवी बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, डावी बाजू वाहतुकीस खुली ठेवण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांनी सांगितले. 

बोपोडी परिसरात असणाऱ्या झोपडपट्ट्या काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने काढल्या त्यानंतर या ठिकाणी पूल उभारणीच्या कामाला सुरवात झाली आहे. उर्वरित पुलाच्या कामामध्ये आठ ठिकाणी पाइल बसवण्यात येणार आहेत, त्यापैकी एका ठिकाणी पाइल बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. या ठिकाणी ३० मीटरचा गर्डर स्पॅम बसवण्यात येणार असून, त्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. नव्या पुलावर १४६ मीटर लांबीची अबेटमेंट भिंत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत त्यापैकी ८६ मीटरची भिंत बांधण्यात आली आहे. उर्वरित ६० मीटरची भिंत बांधण्याचे काम लवकर हाती घेण्यात येणार असल्याचे ओंबासे यांनी सांगितले.

सध्या सुरू असणाऱ्या कामाच्या ठिकाणी दोन झाडे आणि केबल वाहिन्यांची थोडी अडचण आहे. कामाच्यामध्ये येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचे काम पुणे महापालिकेकडून करण्यात येणार असून, केबल वाहिन्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना कळवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 

Web Title: construction of new bridge next to Haris bridge near Bopodi is completed by March

टॅग्स