आंबिल ओढ्यात बांधकाम नाही - बागूल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नाला गार्डन व क्रीडा संकुल हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी पुढाकार घेऊन पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुमारे १८ - २० वर्षांपूर्वी पूर्ण करून घेतले. या नाल्यातून पाणी वाहून नेण्याचीही क्षमता वाढविली तसेच तेथे पक्के बांधकाम केले नाही, असे नगरसेवक आबा बागूल यांनी म्हटले आहे.

पुणे - नाला गार्डन व क्रीडा संकुल हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी पुढाकार घेऊन पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुमारे १८ - २० वर्षांपूर्वी पूर्ण करून घेतले. या नाल्यातून पाणी वाहून नेण्याचीही क्षमता वाढविली तसेच तेथे पक्के बांधकाम केले नाही, असे नगरसेवक आबा बागूल यांनी म्हटले आहे.  

आंबिल ओढ्यात केलेल्या बांधकामामुळे पूर आला, असे एका स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे आहे. त्यावर बागूल म्हणाले, ‘‘नाला गार्डन करताना रहिवाशांनी अतिक्रमित केलेली सुमारे पंधरा फूट जागा परत मिळवली व हे नाला गार्डन साकारले. तसेच नाल्याच्या बाजूने सुशोभित फुलझाडे लावून हा सारा परिसर दुर्गंधीमुक्त व सुशोभित केला.

महापालिकेच्या माध्यमातून २००१ च्या सुमारास क्रीडा संकुलाची उभारणी मी करून घेतली. नागरिकांच्या दृष्टीने अतिशय सोईचे असणारे हे क्रीडा संकुल विविध कायदेशीर चक्रांमध्ये अडकवून बंद पाडले गेले. नाल्यात नसलेले हे संकुल पाडून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला नाही.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction not in Aambil Odha aaba bagul