बांधकाम शुल्काच्या उत्पन्नात घट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मंदीचा परिणाम; सहा महिन्यांत सव्वाशे कोटीचे नुकसान
पुणे - महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या बांधकाम शुल्काच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट तब्बल तीनशे कोटी रुपयांनी वाढले असतानाच, या उत्पन्नात गेल्या सहा महिन्यांत सव्वाशे कोटीची घट झाली आहे.

महापालिकेला या शुल्कापोटी गेल्या सहा महिन्यांत केवळ 321 कोटी रुपये मिळाले असून, गेल्या वर्षी (2015-16) याच कालावधीत 438 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. बांधकाम परवानगीचे प्रमाण कमी झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवाळीनंतर बांधकाम क्षेत्रातील मंदी मावळल्यानंतर येत्या जानेवारी महिन्यापासून बांधकाम परवानगीचे प्रमाण वाढण्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षातील शेवटच्या तीन महिन्यांत बांधकाम शुल्काचे उत्पन्न वाढेल. परिणामी, उद्दिष्ट गाठता येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

राज्यात गेल्या वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बांधकाम क्षेत्रात मंदी आल्याने गेल्या वर्षभरात नव्या घरांच्या नोंदणीचे प्रमाण कमी झाले. समाधानकारक पाऊस झाल्याने या क्षेत्रातील मंदी कमी होण्याची शक्‍यता होती; परंतु दसरा आणि दिवाळीतही त्याचे परिणाम जाणवले.

परिणामी, महापालिकेच्या बांधकाम शुल्कात घट झाली असून, गेल्या वर्षी एप्रिल 2015 ते मार्च 2016 या आर्थिक वर्षात महापालिकेला उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे, सुमारे 788 कोटी 37 लाख रुपये मिळाले. या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत उत्पन्नाचा आकडा कमी होता. शेवटच्या तीन महिन्यांत त्यात वाढ झाल्याचे दिसून आले.

महापालिकेच्या बांधकाम खात्याचे यंदा म्हणजे, एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत सुमारे 1 हजार 45 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असतानाही आतापर्यंत केवळ 321 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, 'बांधकाम क्षेत्रात अजूनही मंदी असून, त्याचा परिणाम बांधकाम विभागाच्या महसुलावर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाले आहे. त्यात प्रामुख्याने बांधकाम परवानगीच्या अर्जांचे प्रमाण कमी झाले आहे. या पुढील काळात परिस्थिती सुधारल्यास येत्या दोन महिन्यांत उत्पन्नात वाढ होण्याची आशा आहे.''

2016-17 मधील उद्दिष्ट : 1 हजार 45 कोटी 15 लाख
ऑक्‍टोबरअखेर मिळालेले उत्पन्न : 321 कोटी 40 लाख
2015-16 मधील एकूण उत्पन्न : 788 कोटी

Web Title: Construction revenue charges decrease