esakal | स्वाईप मशिनद्वारे पेमेंट करताना ज्यादा पैसे आकारले जातायत? मग वाचा ही बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

Swipe_Machine

स्वाइप मशीन सेवेसाठी विक्रेत्याला प्रत्येक व्यवहारावर (स्वाइप) बँकेला विशिष्ट शुल्क द्यावे लागते. ते देखील 0.4 ते 0.75 टक्के एवढे अत्यल्प असते.

स्वाईप मशिनद्वारे पेमेंट करताना ज्यादा पैसे आकारले जातायत? मग वाचा ही बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'तुम्ही डेबिट कार्डने पेमेंट‌ करणार आहात‌ का?'... हो!... 'मग तुम्हाला ज्यादा‌ चार्ज भरावा लागेल'... पण का इतर दुकानामध्ये‌ तर घेत‌ नाहीत!... 'ही आमची‌ पॉलिसी आहे, तुम्हाला कार्ड पेमेंटवर ज्यादा चार्ज द्यावा लागेल...'

एखाद्या‌ दुकानात विक्रेता आणि ग्राहकांमधील हा संवाद कधी‌तरी तुम्ही ऐकला असेल किंवा तुम्हाला एखाद्या दुकानात‌ हा अनुभव आला असेल. तुम्ही जर डेबिट वा क्रेडिट कार्डद्वारे पैसे अदा‌ करीत असाल, तर तुमच्याकडे हमखास दोन टक्के वा विशिष्ट रकमेची जादा आकारणी केली जाते. सध्या कोरोनाच्या‌‌ काळात प्रत्येकजण रोख पैशांऐवजी डेबिट कार्डद्वारे खरेदी करीत आहेत. अशा परिस्थितीत विक्रेते कार्डाद्वारे पैसे अदा केल्यास अतिरिक्त शुल्काची मागणी करीत असल्याची ग्राहकांची‌ तक्रार आहे. 

Ganeshotsav 2020 : 'त्या' मंडळांनी मागितली मंडप उभारण्याची परवानगी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले लक्ष​

तुम्ही रुपे डेबिट कार्ड वा युनिफाइड पेमेट इंटरफेस‌ (यूपीआय) म्हणजे भीम अॅप वा तत्सम पद्धतीने बिल अदा केल्यास विक्रेत्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज‌ नाही.

शुल्क आकारणीचे कारण
कोणतीही खरेदी झाल्यानंतर बिल अदा करताना जादा शुल्क मागितले जाते. त्यावेळी ग्राहक दहा-वीस रुपयांचा विचार करीत नाही, पण प्रत्येकाकडून हे शुल्क बेकायदा वसूल‌ केले जाते. कारण स्वाइप मशीनची सेवा घेताना विक्रेत्याला प्रत्येक‌ व्यवहारावर (स्वाइप) काही शुल्क भरावे लागते. रिझर्व्ह बँकेने ते आता अत्यल्प केले आहे. ते वसूल करण्यासाठी‌ कार्डने केलेल्या खरेदीवर हे शुल्क आकारून त्याचा बोजा ग्राहकांच्या माथी मारला‌ जातो, पण हे नियमबाह्य आहे,‌ असे तज्ज्ञ‌ सांगतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; गोरगरीब आणि गरजू पुणेकरांना मिळणार दिलासा​

सनदी लेखापाल यशवंत‌ कासार यांनी सांगितले की, स्वाइप मशीन सेवेसाठी विक्रेत्याला प्रत्येक व्यवहारावर (स्वाइप) बँकेला विशिष्ट शुल्क द्यावे लागते. ते देखील 0.4 ते 0.75 टक्के एवढे अत्यल्प असते. परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, ग्राहकाने रुपे कार्ड वा भिम अॅप वा कोणत्याही यूपीआयद्वारे बिल अदा‌ केल्यास विक्रेत्याला कोणतेही शुल्क बँकेला द्यावे लागत नाही. त्यामुळे ग्राहकाने या कार्ड वा यूपीआयद्वारे बिल दिल्यास, त्यावर विक्रेत्याला अतिरिक्त‌ शुल्क आकारणी करता येत नाही. तरीही जादा‌ शुल्क मागत असेल, तर ग्राहकांनी त्यांना हा नियम‌‌ सांगितला पाहिजे."

तरुण-तरुणींनो, मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करताय? तर 'जोकर'पासून राहा सावध​

स्वाइप मशीन सेवेसाठी‌‌ विक्रेत्याकडून बँकेला शुल्क द्यावे लागत असले,‌ तरी ते‌‌ ग्राहकाकडून वसूल करावे याबाबत रिझर्व्ह‌ बँकेने सूचना जारी केलेल्या नाहीत. काही विक्रेते वस्तू विक्रीवर मिळणाऱ्या‌ नफ्याचा विचार करून शुल्क आकारणी करीत‌ नाहीत. परंतु छोटे‌ व्यापारी आकारणी करतात. त्यासाठी ग्राहकांनी रुपे हे भारतीय‌ डेबिट कार्ड आणि भिम अॅपचा वापर करावा, म्हणजे जादा पैसे द्यावे लागणार नाही, असे यशवंत‌ कासार म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image