Ganeshotsav 2020 : 'त्या' मंडळांनी मागितली मंडप उभारण्याची परवानगी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी तो मंदिरात करणे शक्य नाही. मंदिरांमध्ये एक मूर्ती असताना आणखी एका मूर्तीची प्रतिष्ठापना करणे योग्य नाही.

Ganesh Festival 2020 : पुणे : कायमस्वरूपी मंदिरे नसलेल्या मंडळांना यंदा गणेशोत्सवात (Ganeshotsav) छोटा मांडव उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गणेश मंडळांनी (Ganesh Mandal) गुरुवारी (ता.१३) केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने शुक्रवार पेठेतील लाड सुवर्णकार धर्मशाळेत झालेल्या बैठकीत गणेश मंडळांनी ही मागणी केली. सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील, फरासखाना पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, भरत मित्र मंडळाचे प्रमुख बाळासाहेब दाभेकर, भाऊ करपे, दत्ता सागरे तसेच साठ- सत्तर मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पांगुळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला सव्वा लाख रुपयांचा मदत निधीचा धनादेश दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहास घडवला; मोडला अटलबिहारी वाजपेयींचा विक्रम

उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी तो मंदिरात करणे शक्य नाही. मंदिरांमध्ये एक मूर्ती असताना आणखी एका मूर्तीची प्रतिष्ठापना करणे योग्य नाही. सजावट नसेल तसेच अभिषेक, पूजा, आरती असे धार्मिक विधी भाविकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने पाहता येतील. उत्सव मंदिरात केला तर बंदिस्त जागेत गर्दी होण्याचा धोका आहे.

उत्सव बंदिस्त जागेऐवजी खुल्या जागेत करणे सुरक्षित आहे, अशी भूमिका मंडळांनी मांडल्याचे खडकमाळ आळी मंडळाचे ऋषीकेश बालगुडे यांनी सांगितले. घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच करणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने विसर्जन हौदाची व्यवस्था करावी. तेथे सोशल डिस्टसिंग पाळून विसर्जन करण्यात येईल, अशी मागणीही यावेळी काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा​

''शहरातील बहुतेक मंडळांची कायमस्वरुपी मंदिरे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी स्वतंत्र मांडव न थाटता मंदिरातच गणपतीची प्रतिष्ठापना करावी,'' अशी भूमिका पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मध्यंतरी घेतली होती. काही मंडळांनी याप्रकारे उत्सव साजरा करण्यास होकार दर्शवला असला तरी अनेक मंडळांनी छोट्या मांडवाचा आग्रह कायम ठेवला असल्याचे या बैठकीवरून स्पष्ट झाले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Mandals in Pune have demanded permission to set up a small mandav during Ganeshotsav