इंदापुरातील या गावांमध्ये कंटेन्मेंट व बफर झोन 

lockdown
lockdown

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील ६ गावांमध्ये कोरोनाचे १६ रुग्ण आढळले आहेत. पश्‍चिम भागातील ६ गावाला कंटेन्मेंट झोन व २१ गावाला बफर झोन लागू केले आहेत. त्यामुळे पश्‍चिम भागातील व्यवहार ठप्प झाले आहेत.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील घोरपडवाडी गावमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर  शेळगाव, जंक्शन, लाकडी, कळंब, बोरी व उद्धट गावामध्ये कोरोना रुग्ण वाढत गेले. सध्या ६ गावांमध्ये प्रशासनाने कंटेन्मेंट झोन जाहीर केला असून, २१  गावांमध्ये बफर झोन आहे. त्यामुळे पश्‍चिम भागातील व्यवहार ठप्प झाले आहेत.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेळगामध्ये ६, जंक्शनमध्ये ४, उद्धटमध्ये ३,  कळंब (लालपुरी), लाकडीमध्ये व बोरीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट व बफर झोनमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. घोरपडवाडी गावातील कोरोना रुग्णास १४ दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे येथील कंटेन्मेंट झोनमधून व निमसाखर, सराफवाडी ही गावे बफर झोन वगळण्यात आली आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील गावे 
शेळगाव, जंक्शन, कळंब, लाकडी, बोरी व उद्धट

बफर झोनमधील गावे 
अंथुर्णे, लासुर्णे, आनंदनगर, वालचंदनगर, चिखली, रणगाव, शिंदेवाडी, काझड, निंबोडी, भवानीनगर,  गोतोंडी, शिरसटवाडी, सणसर, जांब, कुरवली, तावशी, थोरातवाडी, घोलपवाडी, पवारवाडी, हिंगणेवाडी, उदमाईवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com