राज्यातील सर्वच जिल्ह्यात दूषित पाणी!

दिलीप कुऱ्हाडे
बुधवार, 22 मे 2019

पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम, फ्लोराईडसह क्षार आणि लोहाचे, गढूळपणा, नाल्यातील कुजलेल्या प्राण्यांचे अवशेष, नाल्यातील दुर्गंधी आढळली आहे. 

प्रत्येकाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे.मात्र महानगरपालिका, नगरपरिषदा असो कि ग्रामपंचायत नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास असर्मथ असल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या april महिन्याच्या अहवालात दिसून येते. प्रयोगशाळेत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याचे अणुजीव व रासायनिक तपासणी दूषित पाणी असल्याचे आढळले आहे. दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे पटकी, कावीळ, विषमज्वर, अतिसार अशा जलजन्य साथरोगाचा प्रादुर्भाव होतो. 

‘‘पिण्याच्या पाण्याच्या अणुजीव तपासणीत कोलिफॉम आढळले आहे. यामध्ये हिंगोली, जालना, ठाणे, बीड, नागपूर, गडचिरोली आणि अकोला हे जिल्हे आघाडिवर आहेत. तर नागपूर मध्ये पिण्याच्या पाण्यात गढूळपणा, नाईट्रेट्‌स अर्थात कुजलेल्या प्राण्यांचे अवशेष, क्षार आणि फ्लोरॉईड्सचे अधिक प्रमाण आहे. ’’
- प्रसाद गायकवाड, विश्‍लेषक, राज्य आरोग्य प्रयोगशाळा

‘‘शहरी व ग्रामिण भागातील सार्वजनिक ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे साठे निर्जंतुक व पिण्यास योग्य राहतील याची खबरदारी घेण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये. पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोर किंवा तुरटीचा वापर करावा.’’
- डॉ. तानाजी माने, उपसंचालक आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा

जिल्हा - दुषित पाण्याचे नमुने टक्के 
हिंगोली - २३ 
जालना - १८.३ 
ठाणे - १६
बीड - १४.३
औरंगाबाद, परभणी -१३
अकोला, नागपूर, बुलढाणा, उस्मानाबाद,गडचिरोली - १२
नांदेड, सिंधूदुर्ग - ११ 

Web Title: contaminated water at all districts of state