Endlife
sakal
पुणे - गुलटेकडी परिसरात एका बांधकाम क्षेत्रातील ठेकेदाराने गुरुवार (ता. १६) राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन जीवन संपविले. खलील रज्जूलाल शेख (वय-६५, रा. डायस प्लॉट, मार्केट यार्ड) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी केलेला व्हिडिओ व्हायरल झाला असून, घटनास्थळी चिठ्ठी आढळली आहे. त्यात काही राजकीय नेत्यांसह व्यावसायिकांची नावे घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.