Pune : बेकायदा उत्खनन प्रकरणी बारामतीत ठेकेदाराला चार कोटींचा दंड

उंडवडी सुपे येथील जमीनीतील मुरुमाचे कोणतीही परवानगी न घेता उत्खनन केल्याची तक्रार या प्रकरणी दाखल झाली होती. त्या नंतर मंगलदास निकाळजे यांच्या पाठपुराव्यानंतर शासकीय यंत्रणेने याचे पंचनामे केले. त्या नंतर 8076 ब्रासचे बेकायदा उत्खनन केल्या प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन यांना नोटीस देण्यात आली होती.
crime
crime esakal

बारामती - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदार शेळके कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांना बारामतीच्या तहसिलदारांनी तब्बल 4 कोटी 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी पाठपुरावा केला होता. उंडवडी सुपे येथे मुरुमाचे बेकायदा उत्खनन केल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांनी शेळके कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांच्या तर्फे महेश श्रीराम सरदार यांना सात दिवसात हा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उंडवडी सुपे येथील जमीनीतील मुरुमाचे कोणतीही परवानगी न घेता उत्खनन केल्याची तक्रार या प्रकरणी दाखल झाली होती. त्या नंतर मंगलदास निकाळजे यांच्या पाठपुराव्यानंतर शासकीय यंत्रणेने याचे पंचनामे केले. त्या नंतर 8076 ब्रासचे बेकायदा उत्खनन केल्या प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यांच्या वतीने या बाबत कोणताही खुलासा सादर करण्यात आला नाही.

तहसिलदारांनी या प्रकरणी सर्व वस्तुस्थिती तपासल्यानंतर हे उत्खनन कोणतीही परवानगी न घेता केलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या नंतर त्यांनी शेळके कन्स्ट्रक्शनला 4 कोटी 11 लाखांचा दंड ठोठावला.

माहिती अधिकार कार्यकर्ते हे प्रकरण लावून धरतात त्यातून शासनाच्या तिजोरीत चार कोटींचा महसूल जमा होतो. ज्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हे उत्खनन होऊ नये म्हणून जबाबदारी आहे,

ते नेमके काय करत होते याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आता पुढे येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना या प्रकरणात कमालीचा संघर्ष करावा लागतो हेही उघड सत्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com