NK Patil : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी एन के पाटील निलंबित

अपघात प्रकरणी त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
NK Patil
NK Patilesakal

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील यांच्या वर्तणूकीमुळे शासनाची प्रतिमा मलीन झाल्याने त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचा भंग केल्याचे कारणास्तव,सदर नियमाच्या तरतूदीनुसार निलंवित केल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी सोमवारी (ता.०८) काढला.

NK Patil
Nashik News : इंदिरानगर वीज प्रश्न राजकारणाच्या सापळ्यात ? एकत्र प्रश्‌न सोडविण्याची नागरिकांची अपेक्षा

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या विरोधात स्थानिक नागरिक, नगरपरिषदेतील कर्मचारी व अनेक सामाजिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी असंख्य तक्रारी शासनाकडे दाखल केल्या होत्या.वाढत्या तक्रारींमुळे मुख्याधिकारी एन के पाटील यांची गेल्या १ डिसेंबराला पिंपरी चिंचवड महापालिकेत मुदतपूर्व बदली करण्यात आली होती मात्र,पाटील यांनी बदलीला मॅटमध्ये आव्हान देत,आठवडाभरातच पुन्हा रुजू झाले होते.मुख्याधिकारी पाटील हे त्यांच्या कर्तव्यांबाबत उदासीन असल्याने शहरामधील आरोग्य, पाणी, स्वच्छता यासह इतर नागरी मूलभूत सुविधांचा प्रश्‍न उपस्थित झाला होता.सदर गंभीर विषयांबाबत मुख्याधिकारी पाटील यांच्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असणे, नगरपालिकेतील कर्मचारी व नागरिक यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलणे तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत असभ्यपणे लज्जास्पद अशी वर्तणूक करणे,पत्रकारांशी अशोभनीय वर्तन करणे,कार्यालयीन वेळेत नगरपरिषद कार्यालयात मद्यपान करुन येत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीकडून निदर्शनास आले होते.

NK Patil
Crime News : वडिलांसह पाच जणांकडून लहान मुलीवर अत्याचार

तळेगाव दाभाडे येथे गेल्या १ जून रोजी दुपारी एन के पाटील यांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका कारला धडक दिलयानंतर पळून गेले.या अपघात प्रकरणी त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.अश्या भ्रष्ट, उदासीन आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या चारित्र्यहीन मुख्याधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करून त्यांचे कायमस्वरूपी निलंबन करावे अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होती.याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त यांनी देखील नगरविकास विभागाला अहवाल पाठविला होता.मुख्याधिकारी एन के पाटील यांच्यावर कडक कारवाईसंदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुराव्यांनिशी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता.मुख्यधिकाऱ्यावर कारवाईसंदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधी मांडणार होते.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचा भंग केल्याचे कारणास्तव एन के पाटील यांना निलंवित केल्याचा आदेश अखेर सोमवारी (ता.०८) सायंकाळनंतर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून काढण्यात आला.

NK Patil
Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; नाना महालेंसह अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात

पुढील आदेश निघेपर्यंत पाटील हे निलंबित राहतील.दरम्यानच्या कालावधीत पाटील यांचे मुख्यालय पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे राहील.पाटील यांना शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमातील तरतूदीनुसार,त्यांना खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही.अथवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही.अन्यथा गैरवर्तणूकीबाबत त्यांना दोषी समजण्यात येऊन त्याप्रमाणे त्यांचेविरुध्द कारवाई करण्यास ते पात्र होतील.अशा परिस्थितीत निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क ते गमावतील असे नगरविकास विभागाच्या निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुख्यधिकारी पाटील यांच्या बदलीचा आदेश निघताच तळेगावातील असंख्य नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आमदार सुनील शेळके यांचे आभार मानले आहे.

विधीमंडळातील माझ्या प्रस्तावित लक्षवेधीची दखल घेऊन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अकार्यक्षम,भ्रष्ट आणि वादग्रस्त मुख्यधिकाऱ्यास निलंबित केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास विभागाचे तळेगाव दाभाडेमधील नागरिकांच्या वतीने जाहीर आभार !

- आमदार सुनील शेळके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com