Amit Shah Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अमित शाहंचा फोटो; 'भारताचा चाणक्य' म्हणून वादग्रस्त बॅनर?; काँग्रेसने विरोध करताच पोस्टर गायब

Amit Shah Pune News : पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 'भारताचा चाणक्य' संबोधणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रासोबत लावलेला बॅनर वादाच्या भोवऱ्यात सापडला.
Amit Shah Pune News

Amit Shah Pune News

esakal

Updated on

Pune Amit Shah Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी लावण्यात आलेला 'शौर्यभूमीत भारताच्या चाणक्याचे स्वागत' असा मजकूर असलेला स्वागताचा बॅनर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरवर विरोधकांनी टीका केल्यानंतर तो आज (ता.०१) शनिवारी सकाळी काढून टाकण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com