
पुणे : राज्यात लवकरच कथित 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा तयार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी राज्य शासनाकडून उच्चस्तरीय समितीची नेमणूक देखील करण्यात आली आहे. मात्र, या कायद्याला विरोध देखील होत आहे. धर्मातरविरोधी कायदे असतानाही नवा कायदा अस्तित्वात आणण्याचा हेतू हा संविधान विरोधी असल्यानं त्यास मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा विरोध असल्याचं यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दिन तांबोळी यांनी सांगितलं आहे.