बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन यंदा डॅलस येथे होणार

Ajit Jagtap
Ajit Jagtap

पुणे : अमेरिकेत पारंपरिक पेहराव, तांबडा-पांढरा रस्सा अशा मराठी गोष्टींचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन आहे. अमेरिकेतील मराठी लोकांसाठी आयोजित केलेले हे अधिवेशन यंदा डॅलस येथे होणार आहे.

अमेरिका आणि कॅनडातील मराठी लोकांसाठी हे अधिवेशन दर दोन वर्षांनी भरवण्यात येते. यंदा 11, ते 14 जुलैमध्ये अधिवेशन होणार आहे. पैठणी, नऊवारी, फेटे, नथ अशा अनेक गोष्टींमुळे अमेरिकेत मराठमोळे वातावरण होत असते. यावर्षी डॅलस फोर्ट वर्थकडून हे अधिवेशन भरवण्यात येणार आहे. ज्येष्ठांपासून तरूणांपर्यंत सर्व वयोगटांतील लोकांसाठी या दरम्यान कार्यक्रम होणार आहेत. मराठी नाटकं, संगीत, आहार, बिझनेस एक्स्पो अशा विविध गोष्टी यामध्ये समाविष्ट असतील. तसेच मराठी खवय्यांसाठी महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक पदार्थांची रेलचेल असेल. महाराष्ट्रातून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे, आहातज्ज्ञ जगन्नाथ दिक्षित आदी उपस्थितराहणार आहेत. या अधिवेशनासाठी 350 स्वयंसेवक काम करत आहेत.
 

डॅलस फोर्ट वर्थचे अध्यक्ष अजित जगताप सकाळशी बातचित करताना म्हणाले, या अधिवेशनाची
तेथील मराठी लोक आतुरतेने वाट बघत असतात. या निमित्ताने तेथील वधू-वरांचे
मेळावे होतात. तसेच शाळा-महाविद्यालयांचे माजी विद्यार्थी खास वेळ काढून या
अधिवेशनाला येतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com