मीही कोरोना बाधित, दुकान कसे उघडणार ?

अनिल सावळे
Friday, 11 September 2020

'धान्य वाटप करताना दररोज ग्राहकांशी संपर्क येतो. शहरातील 14 ते 15 रेशन दुकानदार कोरोनाबाधित झाले आहेत. मीही कोरोना बाधित झाल्यामुळे सध्या होम क्वारंटाइन आहे. मग दुकान कसे उघडणार? शहरात दहा रेशन दुकानदारांचा बळी गेला आहे. ई-पॉस मशिनवरील थम्ब इम्प्रेशनमुळे दुकानदारांसमवेत नागरिकही बाधित होत आहेत. आम्हाला विमा संरक्षण कवच नाही.

पुणे - 'धान्य वाटप करताना दररोज ग्राहकांशी संपर्क येतो. शहरातील 14 ते 15 रेशन दुकानदार कोरोनाबाधित झाले आहेत. मीही कोरोना बाधित झाल्यामुळे सध्या होम क्वारंटाइन आहे. मग दुकान कसे उघडणार? शहरात दहा रेशन दुकानदारांचा बळी गेला आहे. ई-पॉस मशिनवरील थम्ब इम्प्रेशनमुळे दुकानदारांसमवेत नागरिकही बाधित होत आहेत. आम्हाला विमा संरक्षण कवच नाही. परंतु कोणाला काही देणे घेणे नाही...ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला...सरकार थम्ब इम्प्रेशनवर का अडून बसले आहे, हेच कळत नाही?' ही संतप्त भावना आहे बिबवेवाडीतील रेशन दुकानदार आणि संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांची...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे सरकारने रेशन दुकानदारांना ई पॉस मशिनवर स्वत: थम्ब इम्प्रेशन करून धान्य वाटपास परवानगी दिली होती. एप्रिल ते जुलैअखेरपर्यंत ही मुभा देण्यात आली. परंतु एक ऑगस्टपासून ती बंद करण्यात आली. सध्या बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. शहरातील काही रेशन दुकानदार बाधित झाले आहेत. त्यामुळे ते दुकानच उघडू शकत नाही. तसेच, नागरिकांचे जीव जात असताना ई पॉस मशिनचा आग्रह कशासाठी? असा प्रश्‍न डांगी यांनी केला.

अरे वा ! भोरमधील दुर्गम भागातील नागरिकांना मिळणार मोबाईल व्हॅनद्वारे रेशन

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रेशन दुकानदारांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशीही संघटनेची मागणी होती. त्याबाबत रेशन दुकानदार हे सरकारी कर्मचारी नाहीत. त्यामुळे वित्त विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांना जीव धोक्‍यात घालून काम करावे लागत आहे. 

संगणकीकरणामुळे परवानगी नाही 
कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पूर्वीप्रमाणे धान्य वाटपास मुभा द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे. परंतु "देशात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे ई पॉस मशिनद्वारे धान्य वितरण सुरू आहे. पूर्वीप्रमाणे धान्य वितरण करता येणार नाही,' असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यात पालिका कर्मचाऱ्याचा बेडअभावी कोरोनाने मृत्यू

पुणे, पिंपरी चिंचवड शहर स्थिती -
रेशन दुकानांची संख्या - 770 
अन्नसुरक्षा योजना लाभार्थी - 12 लाख 43 हजार 148 
अंत्योदय योजना लाभार्थी - 37 हजार 231 
केशरी शिधापत्रिका लाभार्थी - 30 लाख 27 हजार 167 

राज्यातील रेशन दुकाने - 52 हजार 500


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona affected ration shop open