esakal | कोरोना मृत्यूच्या कारणांचे आता "पोस्टमार्टेम';मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना मृत्यूच्या कारणांचे आता "पोस्टमार्टेम';मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न 

कोरोनाच्या मृतांची कारणे विशेषत: उपचार, त्याची वेळ, अन्य आजार, उपचारांतील तज्ज्ञांचा सल्ला आणि या प्रक्रियेचा परिणाम अशा सर्व घटकांचा अभ्यास केला जाणार आहे.

कोरोना मृत्यूच्या कारणांचे आता "पोस्टमार्टेम';मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यासह पुण्यात कोरोना आटोक्‍यात येत असतानाच या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या कारणांचेही "पोस्टमार्टेम' होणार आहे. कोरोनाच्या मृतांची कारणे विशेषत: उपचार, त्याची वेळ, अन्य आजार, उपचारांतील तज्ज्ञांचा सल्ला आणि या प्रक्रियेचा परिणाम अशा सर्व घटकांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी विशेष समिती (ऑडिट कमिटी) नेमण्यात येणार आहे. 

या समितीच्या कामकाजावर महापालिकेची नजर राहणार असून, प्रत्येक रुग्ण, मृत रुग्णांची सविस्तर माहिती गोळा केला जाणार आहे. त्यानुसार उपचार व्यवस्थेत आणखी काही बदल करता येतील आणि त्याआधारे कोरोनाचा मृत्युदर शून्यावर आणण्याचा या समितीचा उद्देश असेल, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी रविवारी स्पष्ट केले. 

हेही वाचा : ...तोपर्यंत सारसबाग खुली होणार नाही; महापालिकेने दिले स्पष्टीकरण

पुणे शहरात आतापर्यंत 1 लाख 64 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकीच्या सुमारे 4 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे, उपचार अवेळेत आणि योग्य मिळाले नाहीत, म्हणून काही जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी पुण्यातील कोरोनाचा मृत्युदर चार टक्‍क्‍यांपर्यंत गेला. त्यानंतर गेल्या काही दिवसांत साथ कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली आहे; मात्र मृत्युदर तेवढाच राहिला. पुण्यासह अन्य शहरांमधील मृत्युदरात फार फरक नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. याअनुषंगाने मृत्यूची नेमकी कारणे जाणून घेण्यासाठी सरकारने कार्यवाही केली आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात समिती नेमण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहे. त्यानंतर महापालिकेने संबंधित म्हणजे, रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या 94 रुग्णालयांना पत्र पाठविले आहे. कोरोना रुग्णांची सविस्तर माहिती रोजच्या रोज सादर करण्याचा आदेश दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी रुग्णालयांकडून माहितीस विलंब 
पुण्यातील काही खासगी रुग्णालयांकडून चार-चार दिवस रुग्णांच्या मृत्यूची कारणे महापालिकेला कळविली जात नसल्याचे उघड झाले आहे. त्यावरून नातेवाईक, रुग्णालय व्यवस्थापन आणि महापालिका यांच्यात वादाच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने अधिक काळजी घेत रोज तीही नेमकी कारणे देण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना केल्या आहेत. 

हेही वाचा :  लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेला पाच लाखाचा ऐवज पळविला​

पुण्यातील कोरोनाचे मृत्यू  - 4 हजार 385 
मृत्युदर - 2.6 

पुण्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासोबत मृत्यू रोखण्याला प्राधान्य आहे. मृत्युदर शून्यापर्यंत आणण्यासाठी उपचारांत बदल करण्यात येत आहे. रुग्णांना पहिल्या टप्प्यात म्हणजे, दाखल करतानाच योग्य औषधे देत आहोत. तरीही ज्यांचा मृत्यू होत आहे, त्याची कारणे जाणून नवे बदल करू. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका 

loading image