स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर कोरोनाचा परिणाम; शिक्षक अन विद्यार्थ्यांना बदलावं लागणार

ब्रिजमोहन पाटील/ महेश जगताप
Sunday, 27 September 2020

- शिक्षक अन विद्यार्थ्यांनाही बदलावे लागणार
- मुबलक प्रमाणात ऑनलाइन साहित्य उपलब्ध
- ऍपद्वारे शिक्षण

पुणे : स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन म्हणजे तज्ज्ञ प्राध्यापकांचा क्‍लास लावून, सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न असतो. कोरोनामुळे या पद्धतीला ब्रेक लागला आहे. लॉकडाऊच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन आणि अभ्यास हाच आता विद्यार्थ्यांच्या यशाचा मंत्र ठरणार आहे. ऑनलाइनमुळे देशभरातील शिक्षकांचे पर्याय उपलब्ध असल्याने शिक्षकांना चांगल्या दर्जाचे व्हिडिओ तयार करण्याचे आव्हान आहे. तर, इंटरनेटवर उपलब्ध साहित्यातून योग्य साहित्य निवडून विद्यार्थ्यांना परीक्षांची अभ्यास करावा लागणार आहे.

‘न्यू नॉर्मल’ला हवी संयम, शिस्तीची जोड

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणजे मोठे हॉल, शेकडोंच्या संख्येत बसलेले विद्यार्थी, तरीही कोणाचे लक्ष नाही हे शिक्षकांना कळायचं. पण आता "कोरोना'ने सर्वच बदललं आहे. एकाच विषयाचे खास मार्गदर्शन करणारे शिक्षक सकाळी, दुपारी, संध्याकाळी वेगळ्याच क्‍लासमध्ये मार्गदर्शन करत होते. तसेच ते पुणे, दिल्ली, नागपूर अशा शहरात जाऊन शिकवायचे. आता पुण्यात बसून ते एकाच वेळी संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. विद्यार्थ्यांनाही घरबसल्या शिक्षण मिळत आहे. यात तांत्रिक अडचणी येत असल्या तरी हे बदल स्वीकारण्यास विद्यार्थी तयार आहेत.

कोरोनाने झालेले बदल
- ऑनलाइन क्‍लासमध्ये राज्यभरातील हजारो विद्यार्थी मार्गदर्शनास सहभागी
- ऑनलाइनमुळे क्‍लासचे शुल्क 50 टक्‍क्‍यांनी कमी
- व्हिडिओ, नोट्‌स, पुस्तके मोफत उपलब्ध, विद्यार्थ्यांचा खर्च वाचला
- परिस्थितीमुळे पुण्यात न येऊ शकलेले विद्यार्थ्यांना मिळत आहे मार्गदर्शन

चुकांची ‘उत्सवी’ पुनरावृत्ती ठरेल घातक...

अर्थकारणावर परिणाम
कोरोनामुळे क्‍लासचालकांचे उत्पन्न बुडाले आहेच, पण ऑनलाइन क्‍लासमधून शुल्क जमा होत असले तरी त्यावर 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त परिणाम झाला आहे. अनेक संस्था, राष्ट्रीय स्तरावरील ऍप असलेल्या कंपन्यांनी एक महिना, तीन महिने, सहा महिने यानुसार पॅकेज तयार केले असून, त्यासाठी 5 हजारपासून ते 50 हजार रुपये शुल्क आकारले आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी क्‍लासचालकांना सुरवातीला खर्च करावा लागला पण तो प्रत्यक्षात क्‍लास घेण्यासाठीच्या गुंतवणुकीपेक्षा कमी आहे.

नव्या भरतीला वर्षभर ब्रेक
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशात 2020-21 या वर्षात शासकीय नोकर भरती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा, अराजपत्रित गट ब आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा होणार आहे, पण त्यानंतर "एमपीएससी'कडून किमान वर्षभर तरी नवी जाहिरात येणार नसल्याने राज्यातील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. नवी जाहिरात येई पर्यंत त्यांना संयमाने अभ्यास करावा लागणार आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात साहित्य उपलब्ध झाले आहे. पुढील काळात 70 टक्‍के ऑफलाइन व 30 टक्के ऑनलाइन असेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन असेल. देशभरातील तज्ज्ञ शिक्षक ऑनलाइन सर्वांसाठी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांसाठी पर्याय अनेक पर्याय आहेत. त्यामुळे जे प्राध्यापकांना उत्तमकंटेन्ट असलेले व्हिडिओ तयार करतील, लाइव्ह वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवतील त्यांनाच महत्त्व असणार आहे. हा मोठा बदल या क्षेत्रात झाला आहे.''
- भूषण देशमुख, मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

"विद्यार्थ्यांना इंटरनेटवर प्रत्येक विषयाचे व्हिडिओ, नोट्‌स, पुस्तके असे चांगल्या दर्जाचे साहित्य मोफत आणि सशुल्क उपलब्ध आहे. तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार बघता विद्यार्थ्यांना आत्ताच पुण्यात येता येईल अशी स्थिती नाही, त्यामुळे हे साहित्याचा पुरेपूर वापर केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.''
- अशुतोष कुलकर्णी, यूपीएससी टॉपर (देशात 44 वा)

"सध्याच्या आर्थिक चणचणीच्या काळात विद्यार्थ्यांनी शहरात येऊन शिकण्याचा हट्ट न ठेवता ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा. तसेच तीन चार वर्ष अभ्यास केल्यानंतर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवावा, त्यामुळे त्यांच्यावर मानसिक, सामाजिक दडपण कमी होईल. तसेच जो पर्यंत स्थिती सुधारत नाही तो पर्यंत ऑनलाइनच क्‍लासच घ्यावे लागणार आहेत.''
- रंजन कोळंबे, संचालक, आयएएस भगीरथ ऍकॅडमी

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

"ऑनलाइन लेक्‍चर ऐकत आहे त्याचबरोबर ऑनलाइन टेस्ट सिरीजही सोडवत आहे. घरी राहून सर्व अभ्यास उपयुक्त साधने उपलब्ध होतात व फी सुद्धा निम्याने कमी आहे. मात्र नेट कनेक्‍टिव्हिटीचा मुद्दा ग्रामीण भागात जास्त आहे .यामुळे थोडीशी अडचण होत आहे.''
- राज बिक्कड, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona changed the way education now Teachers and students will also have to change