भटजीबुवा म्हणतात, भाजी घ्या भाजी... 

JOSHI
JOSHI

चाकण (पुणे) : लॉकडाउनमुळे अनेकांचे पोटापाण्यासाठी व्यवसाय बदलू लागले आहेत. अशाच स्थितीत कंपनीत काम करणारा कामगार जमेल तो व्यवसाय करू लागला आहे. अनेकांनी वेगळ्या व्यवसायाची वाट निवडली आहे. खेड तालुक्यातील चाकण परिसरातही कोरोनामुळे विविध धार्मिक कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे या विधींवर अवलंबून असलेल्या तुकाराम जोशी या भटजीबुवांनी पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

तुकाराम जोशी या भटजींचे वय चाळीस आहे. ते आपल्या कुटुंबासह चाकण येथे खोली भाडे तत्वावर घेऊन राहत आहेत.  त्यांच्या घरी वयस्कर आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आहेत. मात्र, कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून धार्मिक विधी बंद आहेत. त्यामुळे हातात पैसा येणे बंद झाले आहे. पोटापाण्यासाठी काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जोशी यांनी त्यांचा पेहरावही बदलला. पॅन्ट, शर्ट घालून ते दुचाकीवरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहेत. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या शेतात जायचे व त्यांच्याकडून माल विकत घ्यायचा व विकायचा, हे दररोजचे काम त्यांनी सुरू केले आहे.

याबाबत जोशी यांनी सांगितले की, धार्मिक विधी बंद असल्याने काय करायचे व घरातील लोकांची पोटे कशी भरायची, असा प्रश्न कुटुंबातील कर्ता म्हणून सतावू लागला. चिंता वाटू लागली. मग भाजीपाला व्यवसाय करून पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा हा निर्धार केला, आणि व्यवसाय सुरू केला. बारावी शिक्षण होऊनही काही फायदा नाही, असेच वाटते आहे. गोरगरिबांनी या कोरोनाच्या साथीत लॉकडाउनमध्ये कसे जगायचे, हा प्रश्न आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com