बारामतीत कोरोनाचा बारावा बळी; मृत्यूदर घटविण्यात अपयश

मिलिंद संगई
Thursday, 30 July 2020

बारामतीत रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूदर घटविण्यात अपयश येत आहे. ही बाब बारामतीकरांसाठी चिंताजनक आहे. बारामतीचा विचार करता गेल्या सात दिवसात बारामतीत 394 रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी 26 जण पॉझिटीव्ह निघाले तर उर्वरित 358 रुग्ण निगेटीव्ह आहेत. ही आकडेवारी पाहता बारामतीत रुग्ण निगेटीव्ह असल्याचे प्रमाण अधिक आहे, कोरोनाचा प्रसारही रोखण्यात यश मिळाल्याचे आकडेवारीवरुन तरी वाटते आहे. 
 
बारामती : शहरातील एका मेडिकल व्यावसायिकाचा आज पहाटे कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील गुनवडी रस्त्यावरील संशयित कोरोनाबाधित युवकाच्या 75 वर्षीय वडिलांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले नव्हते, मात्र त्यांचा मुलगाच कोरोना पॉझिटीव्ह असल्याने कोरोना संशयित म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. 

'जिल्हा स्वच्छता मिशन'चा एका रात्रीत खेळ खल्लास; राज्यातील स्वच्छता कक्ष इतिहासजमा होणार!​

बारामतीत रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूदर घटविण्यात अपयश येत आहे. ही बाब बारामतीकरांसाठी चिंताजनक आहे. बारामतीचा विचार करता गेल्या सात दिवसात बारामतीत 394 रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी 26 जण पॉझिटीव्ह निघाले तर उर्वरित 358 रुग्ण निगेटीव्ह आहेत. ही आकडेवारी पाहता बारामतीत रुग्ण निगेटीव्ह असल्याचे प्रमाण अधिक आहे, कोरोनाचा प्रसारही रोखण्यात यश मिळाल्याचे आकडेवारीवरुन तरी वाटते आहे. 

मार्केटयार्डात भरदिवसा दिवाणजीला लुटले; वाचा चोरट्यांनी कसे लांबवले सव्वातीन लाख​

यात कोरोनाच्या मृत्यूची टक्केवारी मात्र चिंताजनक असल्याने आता प्रत्येक कोरोना मृत्यूचे सखोल विश्लेषण करुन मृत्यू दर रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. बारामतीत आरोग्य यंत्रणा उत्तम आहे, अलगीकरण व विलगीकरणाचीही सुविधा व्यवस्थित करण्यात आलेली असून स्वॅब तपासणीही वेगाने होत आहे, रिपोर्टसाठी पुण्यावर अवलंबून राहावे लागत नसल्याने आता कोरोनाचा मृत्यूदर कसा घटविता येईल या बाबत काम करण्याची गरज आहे. दरम्यान काल बारामतीत घेण्यात आलेल्या 41 नमुन्यापैकी 40 अहवाल निगेटीव्ह आले असून एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 129 वर जाऊन पोहोचली आहे. यात बारा जणांचा मृत्यू झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelfth patient death due to Corona in Baramati