esakal | कोरोनात मृत्यू झालेले ६३कर्मचारी अद्याप मदतीविना
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

कोरोनात मृत्यू झालेले ६३कर्मचारी अद्याप मदतीविना

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोरोनाच्या काळात जबाबदारी निभावताना महापालिकेतील कायम सेवेत असेलेल व कंत्राटी कामगार अशा ८८ जणांनी जीव गमावला. पण आत्तापर्यंत केवळ २५ जणांच्या नातेवाईकाना अनुकंपावर नोकरी व २५ लाखाची रोख मदत मदत मिळाली आहे. मात्र, अद्यापही ६३ जणांना मदतीची प्रतिक्षेत आहे. त्यातच आता आरोग्य सेवेशी व्यतरिक्त इतर कामे करताना कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने ५० लाख रुपयांची मदत करावी असे आदेश राज्य शासनाने देऊन दिले असले तरी अद्याप महापालिकेने याचाबाबत निर्णय घेतलेला नाही.

केंद्र शासनाने मार्च २०२० मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच योजना लागू केली होती. महापालिकेने स्वतःच्या अधिकारात ५० लाख रुपये रोख मदत किंवा अनुकंपावर नोकरी व २५ लाख रोख मदत अशी योजना अंमलात आणली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये १८४ नवीन रुग्ण

कोरोनामध्ये एकूण ८८ कर्मचाऱ्यांचा मृत्य झाला. त्यामध्ये ७ कंत्राटी कामगार होते, तर ८१ जण कायम सेवकांपैकी २५ जणांच्या नातेवाईकांना अनुकंपावर नोकरी व २५ लाख रुपये रोख अशी मदत केली आहे. पण अद्याप ५६ जणांना मदत मिळालेली नाही. राज्य शासनाने आॅगस्ट २०२१ मध्ये काढलेल्या आदेशानुसार वैद्यकीय कामा व्यतरिक्त सर्वेक्षण, शोध, त्यांचा मार्ग काढणे, चाचणी केंद्र, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना मृत्यू झाल्यास ५० लाखांचे सानुग्रह अनुदान अथवा विमा काढावा. ‘अ’ व ‘ब’ दर्जाच्या महापालिकांनी हा खर्च स्वताःच्या निधीतून करावा असे आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा: अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

हा आदेश कायम कर्मचाऱ्यांसह कंत्राटी, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश नव्हता ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतून शासनाच्या निकषानुसार, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाखांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील "अ' वर्ग आणि "ब' वर्गाच्या महापालिकांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.

दरम्यान, मृत सेवकांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे धोरण सव्वा वर्षापासून मुख्यसभेसमोर प्रलंबित आहे, तो निर्णय झाल्यास अंमलबजावण होऊ शकेल, तसेच यापूर्वी ज्यांना २५ लाखाची मदत मिळाली आहे, त्यांना आणखी २५ लाख रुपये मिळू शकतील, असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.

कंत्राटी कामगारांना दिलासा

यापूर्वी कंत्राटी कामगारांचा कोरोनाचे काम करताना मृत्यू झाला तर त्यांना कोणतीही मदत मिळाली नहा, त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना मोठा फटका बसला आहे. महापालिकेने या निर्णयाची अंमलबजणी केल्यास थेट ५० लाखाची मदत मिळू शकेल. महापालिकेचे काम करताना ७ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडे आहे.

  • कोरोना काळात मृत्यू झालेले कर्मचारी - ८८

  • कायम सेवक - ८१

  • कंत्राटी - ७

  • मदत मिळालेल सेवक - २५

  • मदत न मिळालेले - ६३

loading image
go to top