esakal | धक्कादायक, दौंडमधील डाॅक्टर दांपत्याला कोरोनाची बाधा, 58 जणांना...
sakal

बोलून बातमी शोधा

corona

दौंड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव फोफावत चालला आहे. पाटस येथे खासगी वैद्यकीय सेवेतील डाॅक्टर दांपत्याला कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालातुन निष्पन्न झाले आहे.

धक्कादायक, दौंडमधील डाॅक्टर दांपत्याला कोरोनाची बाधा, 58 जणांना...

sakal_logo
By
अमर परदेशी

पाटस (पुणे) : दौंड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव फोफावत चालला आहे. पाटस येथे खासगी वैद्यकीय सेवेतील डाॅक्टर दांपत्याला कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालातुन निष्पन्न झाले आहे. कोरोनाचे रुग्ण सापडल्याने गावातील दुकाने व इतर व्यवसाय तत्काळ बंद करण्यात आलेस, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्ययकीय अधिकारी डाॅ.शिवराणी पांचाळ यांनी दिली.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

दगौंड तालुक्यात सध्या कोरोनाने उच्छाद मांडला आहे. दोन दिवसांपूर्वी केडगाव व बोरीपार्धी येथील दोन डाॅक्टरांसह काही जणांना कोरोनाची बाधा झाली. केडगाव येथील कोरोनाची बाधा झालेल्या एका डाॅक्टरांच्या संपर्कात पाटस येथील खासगी वैदयकीय सेवेतील एक नामवंत डाॅक्टर आल्याचे समजले. त्यामुळे आरोग्य विभागाने संबधित डाॅक्टरांसह त्यांच्या डाॅ पत्नीचीही तपासणी केली. या तपासणी अहवालात दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, सबंधीत खासगी हाॅस्पीटलमध्ये गर्भवती व प्रसूतीच्या महिलांची दैनंदिन मोठी गर्दी होती. त्यामुळे या डाॅक्टरांच्या नेमके किती जण संपर्कात आले, याचा आरोग्य विभागाच्या वतीने कसून शोध सुरु आहे. संपर्कात येणाऱया तब्बल 58 जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये संबधीत डाॅ दांपत्याला कुटुंबातील व्यक्ती, दवाखान्यातील कर्मचारी व इतर लोकांचा समावेश असल्याचे वैदयकीय अधिकारी डाॅ. शिवराणी पांचाळ यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण सापडल्याच्या पाश्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गावातील दुकाने व इतर व्यवहार तत्काळ बंद करण्याच्या सुचना दिल्य़ा.  
 

loading image