बैलपोळा सणावरही कोरोनाचे सावट 

सुदाम बिडकर
Tuesday, 15 September 2020

भाद्रपदी बैलपोळा अवघ्या एक दिवसावर आला आहे परंतु कोरोनो संसर्गाचे सावट बैलपोळ्यावर असणार आहे. आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावोगावच्या कुंभारवाड्यात बैलपोळ्याला पुजेचा मान असलेल्या मातीचे बैल बनविण्याच्या काम अंतिम टप्प्यात असले तरी मागील वर्षीच्या तुलनेने मातीच्या बैलांच्या मागणीत निम्म्याने घट झाली आहे.

पारगाव : भाद्रपदी बैलपोळा अवघ्या एक दिवसावर आला आहे परंतु कोरोनो संसर्गाचे सावट बैलपोळ्यावर असणार आहे. आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावोगावच्या कुंभारवाड्यात बैलपोळ्याला पुजेचा मान असलेल्या मातीचे बैल बनविण्याच्या काम अंतिम टप्प्यात असले तरी मागील वर्षीच्या तुलनेने मातीच्या बैलांच्या मागणीत निम्म्याने घट झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतीसाठी बैलांएैवजी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेतकर्यांच्या घरासमोर दिसणार्या बैलजोड्या दिसेनास्या झाल्या आहेत. बैलपोळा एक महीन्यावर आल्यावर बैलपोळ्याला पुजेसाठी वापरण्यात येणारे मातीचे बैल बनविण्याच्या कामाला गावोगावच्या कुंभारवाड्यामध्ये वेग येत असतो. अवसरी बुद्रुक येथील कुंभारवाड्यातील प्रत्येक कुटुंबातील महीला व मुले एक महीण्यापासुन बैल बनविण्याच्या कामात घरातील पुरुष मंडळीना मदत करत आहेत येथे तयार होणार्या बैलांना ग्रामिण भागाबरोबर शहरी भागातुनही मागणी असते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बैलजोडीच्या किमती 50 रुपयांपासून एक हजार रुपये कीमती पर्यंत असतात येथील कुंभारवाड्यातील कुंभार व्यावसायिक बनविलेले मातीचे आकर्षक बैलांच्या प्रतीकृतींना आसपासच्या गावांतील आठवडे बाजाराबरोबर पुणे, ठाणे व मुंबई शहरात विक्री करता पाठवत असतात.

भाद्रपदी बैलपोळा अवघ्या एक दिवसावर आला आहे. कोरोनो संसर्गाचे सावट बैलपोळा सणावर आहे बैलपोळ्यांच्या मिरवणुकांवर बंदी आहे त्यातच गावोगावचे आठवडे बाजार बंद आहेत. अनेक मोठ्या बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये जनता कर्फ्यु सुरु आहे त्यामुळे या कारगीरांनी बनविलेल्या मातीच्या बैलांच्या मागणीत निम्म्याने घट झाली असल्याचे महीला कारागीर रुपाली चव्हाण यांनी सांगीतले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect on bull hive festival