मुलगा- मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात जुळल्या कोरोनाच्या गाठी... 

corona1
corona1

उरुळी कांचन (पुणे) : लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मुला-मुलीची बघाबघी ही अतिशय नाजूक व गोड गोष्ट असते. मात्र, कोरोनाच्या काळात हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे पाच दिवसांपूर्वी पार पडलेला हा गोड कार्यक्रम विवाहेच्छुक तरुण-तरुणीसह त्यांच्या कुटुंबातील नऊ नातेवाईकांसाठी धक्कादायक ठरला आहे. 

उरुळी कांचन येथील एका नामांकित गृहनिर्माण संस्थेत रविवारी (ता. ५) पार पडलेल्य़ा मुला-मुलीच्या बघाबघी कार्यक्रमात सहभागी झालेले विवाहेच्छुक तरुण-तरुणी व त्यांचे तीन नातेवाईक, असे पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. तर, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणखी दोन जणांचे स्वॅब (घशातील द्रव) रिपोर्ट येणे बाकी आहे. तर, दोन जणांच्या स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बघाबघी कार्यक्रमात सहभागी झालेल्या नऊपैकी तब्बल पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने उरुळी कांचन व परिसरात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, मुला-मुलीची बघाबघी कार्यक्रमात सहभागी झालेले विवाहेच्छुक तरुण- तरुणी व त्यांचे तीन नातेवाईक, असे पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची कबुली उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली आहे. विवाहेच्छुक तरुण- तरुणी व त्यांचे तीन नातेवाईक यांना पिपंरीमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आली आहे. 

उरुळी कांचन येथील रहिवाशी मात्र पिंपरी- चिंचवड हद्दीतील एका कंपनीत काम करणारी अनिता (नाव बदलले आहे) व मुबंईमधील तरुण अनिल (नाव बदलले आहे) यांच्या बघाबघीची कार्यक्रम रविवारी (ता. ५) सायंकाळी उरुळी कांचन येथील अनिता हिच्या घरी पार पडला. या वेळी अनिल व अनिता हिच्या घरातील मिळून नऊ नातेवाईक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रविवारी बघाबघीचा कार्यक्रम उरकला, तरी अनिता रविवारपासून तीन दिवस उरुळी कांचन येथे राहण्यास होती. या काळात अनिता हितिला पोटाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पुढील उपचारासाठी अनिता तिला लोणी काळभोर येथील विश्वराज ह़ॉस्पीटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना तिची स्वॅब टेस्ट केली. त्यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 

अनिता कोरोनाबाधित असल्याचे आढळून येताच रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनिल याच्यासह सात नातेवाईकांची स्वॅब तपासणी गुरुवारी (ता. ९) सकाळी केली. यात अनिल व तीन नातेवाईक, असे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर, दोन जणांचा स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर, अद्याप दोघांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. 

दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी दिवसभरात नव्याने चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाबाधित एक्टीव्ह रुग्णांची संख्या ४१ वर पोचली आहे. तसचे,  मुला-मुलीच्या बघाबघी कार्यक्रमात आढळून आलेले पाच रुग्ण विचारात घेतले तर एक्टीव्ह रुग्णांची संख्या ४६ होत आहे. 
 

Edited by : Nilesh Shende   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com