कोरोना पुन्हा वाढतोय; बारामतीत नगरपालिकेकडून उपाययोजना सुरू

Corona-Test
Corona-Test
Updated on

बारामती - शहरातील कोरोनारुग्णांचा आकडा आज 96 पर्यंत जाऊन पोहोचला. दररोज हा आकडा वाढतच असल्याने आता काहीतरी प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे आता नागरिकांना वाटू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावरची गर्दी आपोआपच कमी होताना दिसते आहे, लोक अनावश्यक घराबाहेर पडायचे टाळू लागल्याचे चित्र दिसत आहे.  दरम्यान, बारामती नगरपालिकेने आता तिस-या टप्प्यातील कोरोना सर्वेक्षण सुरु केले आहे. शुक्रवारपासून (ता. 19) सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. 450 कर्मचारी शहरातील 19 प्रभांचे सर्वेक्षण करणार आहेत. प्रत्येक प्रभागात 30 पथके काम करणार आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या प्रभागात प्राधान्याने ऑक्सिमिटर व थर्मल गनच्या मदतीने सर्वेक्षण होणार आहे. दरम्यान सांस्कृतिक केंद्र व कसब्यातील नगरपालिकेची शाळा क्रमांक दोन येथे स्वँब कलेक्शन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेले जाणार आहे. संपर्कातील लोकांना शोधून काढण्यासाठी सोळा आशासेविकांचे पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांचे शुक्रवारी प्रशिक्षण दिले जाणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

बारामतीकरांनो ही काळजी घ्या
•    मास्कचा वापर अनिवार्यपणे करायलाच हवा
•    सॅनेटायझरचा वापर वेळोवेळी करा.
•    सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे
•    अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा
•    जी कामे घरूनच होणे शक्य आहे ती घरुनच करा
•    गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळा, गेलाच तर अंतर राखा
•    सर्दी, ताप, थंडी, घसा दुखणे अशी लक्षणे असल्याच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
•    ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करुन घ्या.
•    सर्वेक्षणासाठी येणा-या शासकीय पथकांना सहकार्य करा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com