बारामतीकरांचे धाबे दणाणले...कोरोना फैलावू लागलाय...!

Corona has started spreading rapidly in baramati
Corona has started spreading rapidly in baramati

बारामती : कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढू लागल्याने बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे. काल रात्री अकरा पर्यंत बारामतीत तब्बल 129 जण पॉझिटीव्ह आल्याने बारामतीची रुग्णसंख्या थेट 1417 वर जाऊन पोहोचली. शहरातील कोरोनाचा स्फोट कमी करण्याच्या उद्देशाने आजपासून पुढील काही  दिवस शहरात कडक लॉकडाऊन पाळला जाणार आहे. नगरपालिका हद्दीतील सर्वच प्रभाग प्रतिबंधित केलेले असल्याने आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच बाबी बंद राहणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच ही घोषणा झालेली असल्याने दोन दिवसात नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी करुन ठेवलेली असल्याने लोकांची गैरसोय तुलनेने कमी होईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढू लागल्याने शहरातील व्यवहारबंद करुन साखळी तोडण्याचा निर्णय घेतला गेला. संपर्क वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत आहे, त्या मुळे ही साखळी तोडणे गरजेचे होते. 

आजपासून फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकच घराबाहेर पडणार असून इतरांनी अत्यावश्यक काम वगळता कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे नाही असे आदेशच निर्गमित झालेले असल्याने पुढील काही दिवस सर्वांनाच घरात बसूनच राहावे लागणार आहे. या मुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे. 

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

एकाच दिवसात 129 रुग्ण सापडल्याने बारामतीत समूह संसर्ग सुरु झाल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. एकाच कुटुंबातील अनेक जण बाधित होत असल्याने कौटुंबिक काळजीही वाढू लागली आहे. 14 दिवस दवाखान्यात व्यतित करण्याच्या भीतीनेच अनेक जण तपासण्याच टाळत असल्याचेही समोर येत आहे. बारामतीत आता दैनंदिन 400 तपासण्या होऊ लागल्याने वेग कमालीचा वाढला आहे. 

एकीकडे रुग्ण संख्या वाढत असली तरी बरे झालेल्या रुग्णांचीही संख्या वेगाने वाढत आहे. बारामतीत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 633 वर जाऊन पोहोचली आहे. तर शहरातील कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 48 वर गेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com