esakal | वारज्यात महिनाभरात कोरोना हॉस्पिटल सुरू

बोलून बातमी शोधा

Covid care center

वारज्यात महिनाभरात कोरोना हॉस्पिटल सुरू

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

पुणे : ''कोरोना रुग्ण वाढत आहे. अनेक गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत. या पार्श्वभूमीवर वारजे येथील गणपती माथा येथे पुणे महापालिकेच्यावतीने नवीन जनरल व मॅटरनिटिव्ह हॉस्पिटल इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी १०० बेडचे तातडीने कोरोना हॉस्पिटल सुरु करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशाने पुणे महापालिका भवन विभाग प्रमुख शिवाजी लंके व आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक दिलीप बराटे महानगरपालिका अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा: कोरोना बाधितांसह कुटुंबाला हवा मानसिक आधार

युद्ध पातळीवर काम करून येथील ही जनरल व मॅटरनिटिव्ह हॉस्पिटल इमारत कोरोनाचे हॉस्पिटल करण्यासाठी वापरण्यास योग्य आहे. इमारतीचे उरलेले किरकोळ काम पूर्ण होईल. त्यासाठी येथे हॉस्पिटलमध्ये लागणारे वैद्यकीय साहित्य, फर्निचर व मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास महिन्याभरात ही इमारत कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी सज्ज असेल. असे नगरसेवक दिलीप बराटे यांनी सांगितले.