esakal | माळशिरस गावात कोरोनाचे थैमान

बोलून बातमी शोधा

covid19
माळशिरस गावात कोरोनाचे थैमान
sakal_logo
By
दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा

माळशिरस : माळशिरस गावात कोरोनाने थैमान घातला आहे. रुग्णांचा आकडा आठवड्यात सत्तरी पार गेला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावात सर्वसामान्य माणसांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या माळशिरस गावामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने बाजारपेठेच्या निमित्ताने येथील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर हडपसर येथील भाजी मार्केटमध्ये ये-जा करत असल्याने गावातील रुग्णांचे प्रमाण मागील आठवडाभरात मोठ्या प्रमाणावर ती वाढले आहे. गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सध्या घेतल्या जात असलेल्या एंटीजन टेस्टमध्ये कोरोणा रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. काल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घेतलेल्या टेस्टमध्ये 17 जण माळशिरस गावातील कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामुळे आठवडाभरात माळशिरस गावातील कोरणा रुग्णांचा आकडा सत्तरी पार गेला आहे.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

शासकीय कोरोना तपासणीतून हा आकडा समोर आलेला असला तरी देखील अद्यापही गावातील अनेक संशयितांनी तपासणी करून घेतलेले नाहीत तसेच काहींनी खासगी लॅबमध्ये तपासणी केली असल्याने त्यांचा आकडा देखील यामध्ये नसल्याने सर्व संशयितांची शासकीय तपासणी केल्यास धक्कादायक आकडा समोर येऊ शकतो. दरम्यान गावातील एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्यात सध्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाची प्रयोगशाळा अजूनही ‘निगेटिव्ह’

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गावात फिरतात मोकाट -प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नागरिकांच्या करण्यात आलेल्या तपासणीत अनेक रुग्ण टेस्टमध्ये पॉझिटिव आढळलेले आहेत .यातील काही रुग्ण उपचार न घेता गावात फिरताना आढळून येत असल्याने समूह संसर्ग होण्याची भीती नागरिक बोलू लागले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी टिळेकर मँडम, श्री कवितके, आशा सेविका निर्मला मोरे संशयितांना व टेस्टमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना घरी जाऊन औषधोपचार, गोळ्या देत आहेत ही नागरिकांसाठी जमेची बाजू ठरत आहे.