esakal | पुणे शहर पोलिस दलाची कोरोना तपासणी; उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था

बोलून बातमी शोधा

पुणे शहर पोलिस दलाची कोरोना तपासणी; उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था
पुणे शहर पोलिस दलाची कोरोना तपासणी; उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : शहर पोलिस दलातील पावणे तीनशे जणांना गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादूर्भाव झाला असून त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मात्र शहरातील सर्व पोलिसांची कोरोना चाचणी करणे, त्यांच्या उपचारासाठीची स्वतंत्र व्यवस्था, पुरेसे ऑक्‍सीजन बेड व पोलिसांसाठी रेमडेसिव्हीरचा कोटा अशा वेगवेगळ्या पद्धतीने शहर पोलिसांसाठी स्वतंत्र उपाययोजना पोलिस प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाशी दोन हात करणाऱ्या शहर पोलिस दलाच्या आरोग्याकडे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग, उपचार व अन्य सोई-सुविधा तत्काळ मिळाव्यिात यादृष्टीने पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिस दलामध्ये कोविड सेलची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त, एक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक काम पाहणार आहे. संबंधीत सेलमार्फत पोलिस अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क साधून त्यांची विचारपूस केली जात आहे. त्याचबरोबर पोलिस आयुक्त स्वतः ऑनलाईन माध्यमाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मनोबल वाढवित आहेत.

हेही वाचा: प्रेमाला अडथळा निर्माण झाल्याने प्रेमीयुगलांनी गाठले पुणे

पोलिसांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस रुग्णालयामध्ये ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे 10 ऑक्‍सिजन सिलेंडरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांवर आवश्‍यकतेनुसार सिंबायोसिस लवळे, जम्बो कोविड सेंटर, कमांड हॉस्पिटल येथेही उपचार केले जाणार आहेत. पोलिसांची घरे छोटी असल्याने त्यांच्यासाठी गृहविलगीकरणाची व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील 1980 जणांची अँटीजेन तपासणी झाली असून त्यामध्ये 52 जण कोरोनाबाधीत आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्‍य झाले आहे. तसेच पोलिस दलातील 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या 1981 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित झालेल्या पोलिसांना रेमडेसिव्हीर या इंजेक्‍शनसाठी पोलिस आयुकत अमिताभ गुप्ता यांनी स्वत: अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर अत्यावश्‍यक सेवेतील अन्य कर्मचाऱ्यांसमवेत पोलिसांसाठी रेमडेसिव्हीरचा इंजेक्‍शनचा 10 टक्के वाटा राखीव ठेवण्यात आला आहे.

" प्रत्येक पोलिस ठाण्यांमधील पोलिसांची कोरोना चाचणी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग झाल्यास तत्काळ उपचार करता येतील. त्यासाठीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ऑक्‍सीजन बेड, रेमडेसिव्हीरचा पोलिसांसाठी कोटा व लसीकरणावर भर देण्यात आला आहे.'' - अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त