साखर आयुक्त कार्यालयात 'कोरोना किलर' विषाणूनाशक उपकरण; काय आहे हे उपकरण?

Corona Killer antiseptic equipment at the Sugar Commissioners Office
Corona Killer antiseptic equipment at the Sugar Commissioners Office

पुणे : आयनायझेशनच्या माध्यमातून कोरोना विषाणूस नष्ट करून व्यक्तीचे कोरोना पासून रक्षण करणाऱ्या 'कोरोना किलर' उपकरणाला राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयात बसविण्यात आले आहे. पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संशोधित केलेल्या या उपकरणास नुकतीच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) व नायडू रुग्णालयातर्फे कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यात आले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'आयनायझेशन'च्या तत्वावर तयार केलेल्या 'कोरोना किलर' विषाणूनाशक उपकरणाचे प्रात्यक्षिक बुधवारी (ता. 12) शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयात दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकानंतर हे उपकरण कार्यालयात बसविण्यात आल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली.

याबाबत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, "कोरोनामुळे अनेक उद्योगांप्रमाणे साखर उद्योगही अडचणीत आला आहे. याचा परिणाम साखर करखान्यांमधील कामावरही झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये विषाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया नाशक इलेक्ट्रॉनिक उपकरणे साखर कारखान्यांना उपयुक्त ठरतील. या उपकरणामुळे साखर कारखान्यांना, संबंधित कार्यालये आणि आस्थापनांना दैनंदिन कामकाज करताना कोणतीच अडचण येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com