धक्कादायक, बीडीओ, कृषी अधिकाऱ्यांनंतर प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कोरोना 

प्रफुल्ल भंडारी
Wednesday, 23 September 2020

दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर पदभार स्वीकारणाऱ्या डॅा. सुरेखा पोळ- कांबळे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. 

दौंड (पुणे) : दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर पदभार स्वीकारणाऱ्या डॅा. सुरेखा पोळ- कांबळे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. 

ग्राहक खायला येईनात, बारला परवानगी द्या; व्यावसायिकांची मागणी

दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांना २ सप्टेंबर रोजी कोरोनाची बाधा झाल्यानंतर प्रभारी अधिकारी म्हणून डॅा. सुरेखा पोळ- कांबळे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या व त्या दरम्यान त्यांनाही बाधा झाली. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सातपैकी चार कर्मचाऱ्यांना देखील बाधा झाली होती. ते उपचारानंतर बरे झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दौंड पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी गणेश मोरे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश अडसूळ यांनी यापूर्वी कोरोनावर मात केली आहे. नगरपालिकेचे दोन सदस्य व त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दौंड नगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये २२ सप्टेंबरपासून घरटी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शिक्षक आणि प्राध्यापकांच्या मदतीने नागरिकांचे शारीरिक तापमान, प्राणवायूची पातळी व हृदयाचे ठोके मोजण्यासह कुटुंबातील सदस्य, त्यांचे आजार- व्याधी, आदी माहितीची नोंद केली जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते २२ सप्टेंबर २०२० या कालावधीत एकूण १७७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी उपचारानंतर एकूण १४९९ जण बरे झाले आहेत. शहरातील १८ व ग्रामीण भागातील २९, असे एकूण ४७ नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सक्रिय बाधितांची संख्या २२७ इतकी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to the medical officer in charge