esakal | जिद्द आणि इच्छाशक्तीसह ज्येष्ठ नागरिकाची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

patients

कोरोनाला हरवून पुन्हा आनंदी जीवन जगणाऱ्यांची अनेक सकारात्मक उदाहरणे समोर आली आहेत. याच शृंखलेत आणखी एका ज्येष्ठ नागरिकाची भर पडली आहे. वय वर्षे 66 असणाऱ्या या आजोबांचा एचआरसीटी स्कोअर तब्बल 25 होता

जिद्द आणि इच्छाशक्तीसह ज्येष्ठ नागरिकाची कोरोनावर मात
sakal_logo
By
विठ्ठल तांबे

पुणे- कोरोनाला हरवून पुन्हा आनंदी जीवन जगणाऱ्यांची अनेक सकारात्मक उदाहरणे समोर आली आहेत. याच शृंखलेत आणखी एका ज्येष्ठ नागरिकाची भर पडली आहे. वय वर्षे 66 असणाऱ्या या आजोबांचा एचआरसीटी स्कोअर तब्बल 25 होता. शिवाय, ते मधुमेही आहेत. पण, जिद्द आणि सकारात्मक विचार करणाऱ्या या आजोबांनी कोरोनाला हरवले आहे. हडपसर भागातील रहिवासी असलेले अशोक परशुराम माने असे या कोरोनामुक्‍त व्यक्‍तीचे नाव आहे. हडपसर येथे कार कुशनचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांची 6 एप्रिल रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यात त्यांच्या पत्नी, नात पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यात सुरुवातीला त्यांचा स्कोअर 7 इतका आला. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना तातडीने फायर ऑडिटचे आदेश

मधुमेह आणि वय जास्त असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्याने डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार ते सिंहगड रस्त्यावरील मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. उपचार सुरू असताना दोन दिवसांनी पुन्हा त्यांची एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा स्कोअर 25 पैकी 25 आला. स्कोअर अधिक असल्याने डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचारास सुरुवात केली. जिद्द, इच्छाशक्ती व योग्य उपचार पद्धतीमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आता त्यांची प्रकृती उत्तम असून शनिवारी त्यांना हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आल्याचे मोरया हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. अजितसिंह पाटील यांनी सांगितले.