आंबेगावातील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 51 जणांना...

चंद्रकांत घोडेकर
मंगळवार, 30 जून 2020

आता सापडलेला रूग्ण स्थानिक रहिवासी असल्याने नारोडीकरांची चिंता वाढली आहे. या कोरोना रूग्णाच्या घऱातील 20 जणांना व संपर्कातील 31 जणांना

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील एका 35 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५  झाली आहे.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

या युवकाला 22 जूनपासून ताप येवून त्रास होत होता. काल त्याचा स्वॅब काढून नेण्यात आला. त्याचा रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नारोडीत दुस-या रूग्णाची नोंद झाली. आता सापडलेला रूग्ण स्थानिक रहिवासी असल्याने नारोडीकरांची चिंता वाढली आहे. या कोरोना रूग्णाच्या घऱातील 20 जणांना व संपर्कातील 31 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. नारोडी येथे एका रूग्णाचा कोरोनामुळे एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

आज सकाळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांनी भेट देवून ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच कैलास काळे, माजी उपसरपंच नवनाथ हुले व ग्रामस्थांशी चर्चा केली. संपूर्ण गाव 14 दिवस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील भाजीपाला मॉल व दुध डेअरी बंद ठेवण्यात आली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

सध्या कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात वेगाने होत आहे. आता स्थानिक नागरिक पॉझिटिव्ह होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. तालुक्यात ५२ रूग्णांपैकी ४५ रूग्ण बरे झाले असून, ५ जणांवर उपचार सुरू असून, २  मयत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने मास्क नसणाऱ्यांना दंड आकारावा. त्यांना योग्य ती समज द्यावी. या रूग्णांच्या संपर्कातील 20 जणांना उद्या स्वॅब तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.
 - जालिंदर पठारे
गटविकास अधिकारी, आंबेगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient found in Ambegaon taluka