पुरंदरमधील या गावातही कोरोनाची एन्ट्री

corona1
corona1

परिंचे (पुणे) : पुरंदर तालुक्यतील परिंचे येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचाय व आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी केले आहे.

कोरोनाबाधित रुग्ण हडपसर येथे बॅंकेत नोकरी करत आहेत. गुरुवारी बॅंकेतील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे बॅंकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या स्वॅब घेण्यात आले होते. आज सकाळी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संबंधित रुग्ण परिंचे येथून पुण्यात जाऊन येऊन नोकरी करत होता. परिंचे येथून पुण्यात जाऊन नोकरी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने हायरिस्क कॉन्टॅक्ट व लोरिस्क यादी तयार केली आहे. हाय रिस्कमध्ये कुटुंबातील ९ लोक असून, लोरिस्क यादीमध्ये १६ लोक असल्याचे डॉ. गणेश पवार यांनी सांगितले. 

प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घारमळकर वाडी, परिंचे एसटी स्टॅन्ड, पोलदरा या परिसराचा समावेश असून, बफर झोनमध्ये परिंचे गावठाणासह दुधाळवाडी, जाधव वस्ती, जोगमळा, शेडगे वस्ती परिसराचा समावेश असल्याचे गाव कामगार तलाठी प्रमोद झुरंगे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या वतीने ठोस उपाययोजना म्हणून सोडियम हायपो क्लोराईड फवारणी, प्रतिबंध क्षेत्रातील रस्ते बंद, जनजागृती अभियान करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक शशांक सावंत यांनी सांगितले. 
 
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com