esakal | मंचर ग्रामपंचायत कोरोना नियंत्रण कक्षाचा रुग्णांना मिळतोय मानसिक आधार

बोलून बातमी शोधा

covid19
मंचर ग्रामपंचायत कोरोना नियंत्रण कक्षाचा रुग्णांना मानसिक आधार
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : मंचर शहरातील कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या रुग्णांबरोबर संपर्क साधून त्यांना आधार देण्याचे काम मंचर ग्रामपंचायतीमार्फत केले जात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. गेल्या दहा दिवसांत 500 रुग्णांबरोबर संवाद साधण्याचे काम झाल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. मंचर शहरात वर्षभरात दोन हजार 515 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 333 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना नियंत्रण कक्षातून रुग्णांना मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. कोणत्या दावाखान्यात उपचार घेता, दवाखान्यात सेवा कशी दिली जाते?, काही अडचण असल्यास हेल्पलाईन 8446632425 क्रमांकावर संपर्क साधा. असे आवाहन केले जाते, अशी माहिती सरपंच किरण राजगुरु यांनी दिली. 45 वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आवाहन केले जाते. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे उपसरपंच युवराज बाणखेले यांनी सांगितले.

हेही वाचा: गृहमंत्र्यांकडून मंचर व घोडेगाव रुग्णालयांसाठी एक कोटी 21 लाख

नियंत्रण कक्षातून कोरोना प्राथमिक लक्षणे असलेल्या नागरिकांना रॅपिड एंटीजन चाचणीसाठी सरकारी व खासगी हॉस्पिटल, डॉक्टरचे मोबाईल क्रमांक, रक्त तपासणी प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, उपलब्धता, जीवनावश्यक किराणा, दूध, भाजीपाला इत्यादी घरपोच डिलिव्हरीसाठी विक्रेत्यांचे नंबर दिले जातात. सकाळी 9 ते सायंकाळी सहा वेळेत नियंत्रण कक्ष सुरु असतो.-के. डी. भोजने, ग्रामविकास अधिकारी.

हेही वाचा: राहूल गांधींच्या निकटवर्तीय खासदाराला कोरोनाची लागण; पुणे येथे उपचार सुरु