esakal | गृहमंत्र्यांकडून मंचर व घोडेगाव रुग्णालयांसाठी एक कोटी 21 लाख : देवेंद्र शहा

बोलून बातमी शोधा

wlase patil
गृहमंत्र्यांकडून मंचर व घोडेगाव रुग्णालयांसाठी एक कोटी 21 लाख
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मंचर (ता. आंबेगाव) उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक वैद्यकीय साहित्यासाठी एक कोटी रुपये, ट्रमा केअर युनिट (मंचर) साठी २१ लाख रुपये व याव्यतिरिक्त घोडेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका व सुसज्ज प्रसूतिगृह उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.

हेही वाचा: Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

“आंबेगाव-शिरूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व मंचर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळण्यासाठी साथरोग उपाय योजनेअंतर्गत सामुग्री उपलब्ध करून देणेबाबत विनंती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ आंबादास देवमाने यांनी वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार लिक्विड ऑक्सिजन साठवणूक टँक, सहा व्हेंटिलेटर व बायपास मशीन साठी निधी उपलब्ध झाला आहे. ट्रामा केअर युनिटसाठी विविध साहित्य सामुग्रीसाठी २१ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णालय झाल्यांमुळे प्रसूती व इतर उपचारासाठी घोडेगाव रुग्णालयात रुग्णवाहिका व सुसज्ज प्रसूतिगृह उपलब्ध करण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे.मंचर व घोडेगाव शासकीय रुग्णालयांसाठी निधी मिळण्याची मागणी पाच दिवसांपूवी करण्यात आली होती. वळसे पाटील यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.” दरम्यान, कोरोना रोगाची सद्यस्थिती लक्षात घेता अजूनही व्हेंटिलेटर व इतर साहित्याची उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यकता आहे. दानशूर व्यक्ती व संस्था यांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन शहा यांनी केले आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

मंचर उपजिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागात कोरोना संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामुग्रीची गरज असल्याचे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले होते. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे. ११ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. प्राप्त निधीतून अजून सहा व्हेंटिलेटर व चार बाय प्याप मशीन उपलब्ध होणार आहेत. लहान मुलांसाठीही दोन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. भविष्यात ट्रामा केअर युनिटमध्ये अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. -अंबादास देवमाने, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मंचर.

हेही वाचा: छातीत दुखत आहे.... पुणे पोलिस म्हणतात पुरावा द्या !