नऱ्हे शतकाच्या तर खानापूर, कोंढवे धावडेची अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 

Corona Positive reaches 100 in Narhe and 50 Khanapur, Kondhava Dhavade
Corona Positive reaches 100 in Narhe and 50 Khanapur, Kondhava Dhavade

खडकवासला : खडकवासला ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत नऱ्हे पाठोपाठ खानापूर व कोंढवे धावडेची अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात यांनी सांगितले की, ''तालुक्यात दिवसभरात ५२ नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत ८५५ जणांना लागण झाली आहे. त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ३८३ जण बरे झाले आहेत. तर ४५८ जणांवर उपचार सुरू आहे. यातील तिघेजण गंभीर आजारी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नऱ्हे येथे आता पर्यंत रुग्ण संख्येने शतकाच्या उंबरठ्यावर आहे. रुग्ण संख्या 97 असून त्यातील 50 जण उपचार घेऊन घरी आले आहेत. 45 जणांवर उपचार सुरू आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खानापूरच्या रुग्ण संख्या 46 वर पोचली आहे. सहा जणांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील दोन जण अति दक्षता विभागात उपचार घेत आहे. 40 जण घरी परतले आहेत. त्यातील 10 जण दोन महिन्यापूर्वी घरी आले आहेत. 

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

कोंढवे धावडे येथील रुग्ण संख्या 43 वर पोचली आहे. त्यातील 13 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर 30 जणांच्यावर उपचार सुरू आहेत. न्यू कोपरे गावात 27 रुग्ण होते त्यांच्यातील एका जणाचा मृत्यू झाला आहे. काल 23 जण घरी परतले तीन जणांच्या वर उपचार सुरू आहेत. खडकवासला येथे 38, नांदेड येथे 40, किरकटवाडी 19 रुग्णसंख्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com