कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिलासादायक; जाणून घ्या पुणे विभागातील स्थिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 17 November 2020

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तीन लाख 31 हजार 777 इतका झाला आहे.

पुणे- विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण पाच लाख 18 हजार 757 झाली आहे. त्यापैकी चार लाख 89 हजार 128 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजअखेर 14 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 15 हजार 7 इतकी आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.29 टक्के इतके आहे. 
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तीन लाख 31 हजार 777 इतका झाला आहे. त्यापैकी तीन लाख 14 हजार 447 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या नऊ हजार 242 आहे. कोरोनामुळे आजअखेर आठ हजार 88 रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.78 टक्के आहे. 

उर्वरित चार जिल्ह्यांमधील स्थिती (17 नोव्हेंबरअखेर) : 
सातारा जिल्हा
कोरोना बाधित रुग्ण संख्या : 48 हजार 892 
बरे झालेले रुग्ण : 44 हजार 743 
उपचार घेत असलेले रुग्ण : 2 हजार 506 
मृत्यू : 1 हजार 643 

संयुक्त राष्ट्रात सुधारणेची गरज; ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

सोलापूर जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण संख्या : 43 हजार 238 
बरे झालेले रुग्ण : 39 हजार 441 
उपचार घेत असलेले रुग्ण : 2 हजार 255 
मृत्यू : 1 हजार 542 

सांगली जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण संख्या : 46 हजार 121 
बरे झालेले रुग्ण : 44 हजार 42 
उपचार घेत असलेले रुग्ण : 397 
मृत्यू : 1 हजार 682 

कोल्हापूर जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण संख्या : 48 हजार 729 
बरे झालेले रुग्ण : 46 हजार 455 
उपचार घेत असलेले रुग्ण : 607 
मृत्यू : 1 हजार 667 
 
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ - 
कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात रुग्ण संख्येमध्ये 523 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 359, सातारा 42, सोलापूर 83, सांगली 28 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 11 रुग्णांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona recovery rate Know the situation in Pune division