कापड दुकानात काम करणाऱ्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 16 जणांचे रिपोर्ट... 

प्रा. प्रशांत चवरे
Friday, 17 July 2020

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कापड दुकानातील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १६ व्यक्तींचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे भिगवणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे, तर

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कापड दुकानातील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १६ व्यक्तींचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे भिगवणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे, तर भिगवण स्टेशन येथे आणखी एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे भिगवण स्टेशनकरांची चिंता आणखीनच वाढली आहे. 

काय सांगता, पुणे झेडपीला डाॅक्टर आणि नर्स मिळेना...

भिगवण स्टेशन येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चार रुग्णांपैकी एक महिला ही भिगवण येथील कापड दुकानामध्ये काम करत होती. तिच्या संपर्कातील कापड दुकानातील १६ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे भिगवण शहराला दिलासा मिळला आहे. परंतु, भिगवण स्टेशन येथील सलुन व्यावसायिकाचा कोरोना अहवाल प़ॉझिटिव्ह आहे. त्यामुळे भिगवण स्टेशन परिसराचा धोका आणखी वाढला आहे. सलुन व्यवसायिकाने भिगवण येथे खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेतल्याचे समजते. त्यामुळे आता त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.

भिगवण स्टेशनला कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या भिगवण स्टेशन येथील दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर इतर पाच रुग्णांवर उपचार सुरु आहे. भिगवण स्टेशन हे प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले असून, नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत सरपंच अनिता संतोष धवडे म्हणाल्या की, भिगवण स्टेशन येथे काही रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन व व्यावसायिक यांच्या समन्वयातून भिगवण स्टेशन व भिगवण शहर चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
 

Edited By : Nilesh J Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of 16 people from Indapur taluka is negative