esakal | बारामतीकरांनो, या 60 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट आलाय...
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामतीत एकदमच पाच रुग्ण सापडल्याने प्रशासनही चिंतेत होते. या पाच जणांच्या संपर्कातील 54 व इतर लक्षणे असलेले सहा जण, अशा 60 जणांचे नमुने काल घेण्यात आले होते. आज सर्वांचेच अहवाल

बारामतीकरांनो, या 60 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट आलाय...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहर व तालुक्यातील पाच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील सर्व 54 व इतर सहा, असे 60 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. हे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज बारामतीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. एकाच दिवशी 60 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याने बारामतीकर गॅसवर होते. आज प्रशासकीय यंत्रणेलाही हे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला. 

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

बारामती शहरातील तीन, तर तालुक्यातील दोन, अशा पाच जणांचे एकाच दिवशी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचे धाबे दणाणले होते. कोरोनामुक्त अशी ज्या शहराची ओळख होती, त्या बारामतीत एकदमच पाच रुग्ण सापडल्याने प्रशासनही चिंतेत होते. या पाच जणांच्या संपर्कातील 54 व इतर लक्षणे असलेले सहा जण, अशा 60 जणांचे नमुने काल घेण्यात आले होते. आज सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.  या सर्वांचेच अहवाल निगेटीव्ह आलेले असलेले, तरी त्यांनी विलगीकरणातच राहण्याच्या सूचना या सर्वांना देण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

काळजी घेण्याचे आवाहन 
या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आलेले असले, तरी शहरातील पाच जणांना कोरोनाची लागण झालेली आहे, ही बाबही चिंताजनक असून, नागरिकांनी कमालीची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांनी केले आहे. 

नियमांचे पालन करा
बारामती शहरातील नागरिक व व्यापा-यांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले आहे. मास्कचा वापर करणे, सॅनेटायझरचा वापर करणे, गर्दी न करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, या गोष्टींचा अवलंब कराव्यात, असे ते म्हणाले.