वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का, आणखी एका डॉक्टरला कोरोना 

प्रा. प्रशांत चवरे
Monday, 27 July 2020

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील महिला डॉक्टर व त्यांचा मुलगा कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथील आणखी एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भिगवण व परिसरामध्ये कोरोनाची स्थिती अधिकच धोकादायक झाली आहे.

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील महिला डॉक्टर व त्यांचा मुलगा कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथील आणखी एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भिगवण व परिसरामध्ये कोरोनाची स्थिती अधिकच धोकादायक झाली आहे. अद्याप कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील एकूण ३० व्यक्तींचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्याकडे भिगवणकरांचे लक्ष लागले आहे.

एमपीएससी टाकतेय कात, लवकरच येणार अॅप

भिगवण येथील स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर व त्यांच्या मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे येथील वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. त्यातून सावरत असतानाच सोमवारी (ता. २७) मदनवाडी चौफुला येथील बालरोग तज्ज्ञांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह महिला डॉक्टरांच्या हॉस्पिटलला शस्त्रक्रियेनिमित्त भेट दिली होती. महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल सोमवारी (ता. २७) सकाळी प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आठ याचिकाकर्ते विरूद्ध ठाकरे सरकार, सुनवाणीकडे राज्याचे लक्ष

भिगवण परिसरात दोन दिवसांमध्ये दोन वैद्यकीय व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, भिगवणमध्ये कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. याबाबत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन कुंभार यांच्याशी संपर्क साधला असते ते म्हणाले, नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसून आल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of a doctor from Indapur taluka is positive