esakal | फळविक्रेत्याला कोरोना...इंदापुरातील तब्बल एवढ्या व्यक्ती संपर्कात 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाबाथित युवक फळविक्रेता असून, फळांची विक्री करण्यासाठी तो पुणे व मुंबईला नियमित ये- जा करत होता. गेल्या चार- पाच दिवसापांसून तो आजारी होता. त्याने

फळविक्रेत्याला कोरोना...इंदापुरातील तब्बल एवढ्या व्यक्ती संपर्कात 

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बोरी गावातील ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या संपर्कामध्ये १६ नागरिक आले आहेत. यामध्ये काटेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

बोरी येथील कोरोनाबाथित युवक फळविक्रेता असून, फळांची विक्री करण्यासाठी तो पुणे व मुंबईला नियमित ये- जा करत होता. गेल्या चार- पाच दिवसापांसून तो आजारी होता. त्याने काटेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले होते. संबधित युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

या युवकाच्या संपर्कामध्ये आलेल्या नागरिकांचा आरोग्य विभागाने तातडीने शोध घेतला. यामध्ये बोरी गावातील कुटुंबातील १० व्यक्तींचा व काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह ६ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, सर्वांच्या घशातील नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे यांनी दिली.