उरुळी कांचनमधील सराफ व्यावसायिकला कोरोना...चौदा जणांना...

जनार्दन दांडगे
बुधवार, 1 जुलै 2020

उरुळी कांचन शहरात मागिल सहा दिवसांच्या कालावधीत पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. सराफ व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या सहावर पोचली आहे. सहा जणांच्या संपर्कात आलेल्या सत्तेचाळीस जणांना

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील एक साठ वर्षीय सराफ व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी (ता.  ३०) रात्री उशीरा आढळून आले आहे. त्यामुळे मागिल सहा दिवसांच्या कालावधीत उरुळी कांचन शहरातील अॅक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहावर पोचली आहे. 

सावधान, कोरोनाविषयी मॅसेज फाॅरवर्ड करण्यापूर्वी हे वाचा...

उरुळी कांचनमधील साठ वर्षीय कोरोनाबाधित सराफ व्यावसायिकास मागिल तीन दिवसांपासून सर्दीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे उपचारासाठी पुणे शहरातील एका नामांकित रुग्णालयात शनिवारी दाखल केले होते.  रुग्णालय प्रशासनाने उपचारापूर्वी केलेल्या स्वॅब (घशातील द्रव) तपासणीचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा मिळाला. त्यात सराफ व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या घरातील अकरा नातेवाईक व तीन मोटार चालक, अशा चौदा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे शहरातील एका खासगी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.  सुचिता कदम यांनी दिली. 

कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला

उरुळी कांचन शहरात मागिल सहा दिवसांच्या कालावधीत पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. सराफ व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या सहावर पोचली आहे. सहा जणांच्या संपर्कात आलेल्या सत्तेचाळीस जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.  कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी उरुळी कांचन शहर व परीसरातील सर्व प्रकारचे व्यवहार तीन दिवस बंद ठेवले होते. घराबाहेर पडताना मास्क वारण्याबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. पोलिसांनी मास्कविना फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाईही सुरु केली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अविरत काम करत असून, नागरीकांनीही साथ द्यावी, असे आवाहन  डॉ. कदम यांनी केले. 

बारामतीत कोरोनाची पुन्हा एन्ट्री

कदमवाकवस्तीत जनता कर्फ्यू 
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागिल सहा दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचवर पोचली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने उद्यापासून (गुरुवार) पुढील तीन दिवस सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्याचे बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. त्यातून केवळ मेडिकल व दूध वितरण या दोनच गोष्टी चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात कोणी व्यवहार चालू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास संबधितांवर हजार रुपये दंड व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of a goldsmith from Uruli Kanchan is positive